आपल्या आहारात पालेभाज्या असणे खूप गरजेचे तसेच आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. भाज्यांमध्ये जीवनसत्वे मुबलक प्रमाणात असल्यामुळे ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर तसेच आरोग्यदायी ठरतात.
या आहेत रानभाज्या:-
मेथी, चाकवत, शेपू, पालक या भाज्या आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतातच परंतु काही रानभाज्या सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत या मद्ये चीगळ, तांदळ, घोळ,काटेमाठ, उंबर, करडू,गोखरू, सुरण, पाथरी या रानभाज्या आहेत. या भाज्या आपल्याला शेतामध्ये अगदी सहजपणे उपलब्ध होतात.
1) गोखरू:-
ही भाजी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. या भाजीचे सेवन केल्यामुळे हृदय संबंधित आजारापासून सुटका मिळते तसेच कंबर दुखी व अंग दुखीवर जालीम उपाय म्हणून या रानभाजीचे सेवन फायदेशीर ठरते.
2)कुरडू:-
या भाजीला सिलगोटी सुद्धा म्हणतात बिया, थंड, शीतल, स्नेहन करणाऱ्या व पौष्टिक गुणधर्माच्या आहेत. तसेच जुलाब होत असतील तर याच्या बियाचे सेवन करावे.
तसेच जर का तुम्हाला निद्रानाश असेल तर चांगली झोप येण्यासाठी बियांची भाजी करून देतात.
3) पाथरी:-
या भाजीचे सेवन केल्यास अंगरस जेष्ठमधाबरोबर दिल्यास बाळंतीणीचे दूध वाढते. तसेच जर का तुम्हाला कोरड्या खोकला येत असेल तर याचे चाटण उपयुक्त आहे. तसेच या भाजीचे सेवन केल्याने पित्तशमन होते शिवाय रक्त शुध्दीसाठी उपयुक्त. त्यामुळे त्वचेचे आजार व अशक्तपणा दूर होतो. कावीळ व यकृत विकारात भाजी उपयुक्त आहे.
हेही वाचा:-पोल्ट्री व्यवसाय:-उच्च तंत्रज्ञान पद्धतीचा लेअर पोल्ट्री फार्म, वाचा व्यवस्थापन
सुरण:-
सुरणाच्या भाजीमध्ये अ, ब, आणि. क ही जीवनस्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात त्यामुळे ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. या भाजीचे सेवन केल्यामुळे आतड्याचे आजार नाहीसे होतात. शिवाय कफ, वात, दमा, मूळव्याध, पोटदुखी, हत्तीरोग व रक्तविकारांसारख्या दोषांवर भाजी उपयोगी आहे.
उंबर:-
याला औदुंबर म्हणून सुद्धा ओळखले जाते आरोग्यासाठी ही खूप फायदेशीर भाजी आहे.गर्भपात बंद होण्यास हे औषध दिल्यास गर्भास इजा पोहचत नाही. काही वेळेस लहान मुले झुरतात, खाल्लेले अंगी लागत नाही, उलट्या, जुलाब होतात, अशक्तपणा वाढतो अशावेळी चिकाचे दहा थेंब दुधाबरोबर देतात. त्यामुळं लहान मुलांना आराम मिळतो. तसेच जर का कोणाला गालगुंड, गंडमाळा व सूज यांवर चेक करतात.
Published on: 21 September 2022, 03:41 IST