मंकीपॉक्स विषाणूचा (monkeypox virus) धोका जगभरात हळूहळू वाढू लागला आहे. भारतही मंकीपॉक्सची प्रकरणे वाढत आहेत. देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) मंकीपॉक्सचा आणखी एक संशयित रुग्ण आढळून आला आहे. यासोबतच देशात आतापर्यंत ५ जणांना या विषाणूची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे.
मंकीपॉक्सची लस भारतात कधी येणार?
देशभरात मांकीपॉक्सचा धोका असताना, त्याच्या लसीबाबतही चर्चा जोरात आली आहे. मंकीपॉक्सची लस भारतात कधी येणार याची माहिती खुद्द लस निर्माता सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावाला यांनी दिली आहे.
आदर पूनावाला यांनी सांगितले आहे की, मंकीपॉक्सची लस बनवण्याचा विचार करत आहे. सीरम इन्स्टिट्यूट यासंदर्भात जागतिक भागीदार नोव्हावॅक्सशी चर्चा करत आहे. सध्या ते नोव्हावॅक्सच्या सहकार्याने मंकीपॉक्सची mRNA लस बनवण्याचा विचार करत आहेत. असे सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावाला म्हणाले.
Post Office: आता पोस्ट ऑफिसमध्ये होणार पीक विम्याची नोंदणी; शेतकऱ्यांना दिलासा
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, मंकीपॉक्स आतापर्यंत जगातील 75 देशांमध्ये पसरला आहे, या देशांमध्ये मंकीपॉक्स विषाणूची 16,000 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
Spider Plant: घरी लावा स्पायडर प्लांट; 'या'' मोठ्या समस्यांपासून मिळवा मुक्ती
भारतातील सर्व राज्यांमध्ये मंकीपॉक्सचा इशारा
मंकीपॉक्स विषाणूला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केल्यानंतर, भारतातही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Health Ministry) सर्व राज्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. याशिवाय बिहार, मध्य प्रदेश, उत्तराखंडसह अनेक राज्य सरकारे अलर्ट मोडवर आहेत. तर दिल्ली आणि केरळमध्ये मंकीपॉक्सपासून बचावाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे.
Bank Holiday: ग्राहकांनो बँकेतील कामे आजच उरकून घ्या; ऑगस्टमध्ये 17 दिवस राहणार बँका बंद
Published on: 27 July 2022, 05:43 IST