गेल्या दोन वर्षापासून कोरोनाने हैराण केले असताना आणि अजून सुद्धा कोरोनाचा धोका असताना यामध्येच स्वाइन फ्लूने डोके वर काढले आहे. राज्यामध्ये वेगाने स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असून आतापर्यंत 142 जणांना स्वाइन फ्लूची बाधा झाली असून या संसर्गाने जवळजवळ सात जणांचा मृत्यू झाला आहे.
जून मध्ये पावसाने उघडीप दिली परंतु जुलैमध्ये चांगला पाऊस सुरू होताच स्वाइन फ्लूने डोके वर काढले असून आठ जून पर्यंत केवळ आठ रुग्ण अशी संख्या असलेला स्वाइन फ्लू 142 पर्यंत पोहोचला आहे.
नक्की वाचा:पुणेकरांनो सावधान! सापडला ओमिक्रॉन नवा प्रकार, आरोग्य विभागाची चिंता वाढली
दहा दिवसांचा जर विचार केला तर स्वाइन फ्लूचे 126 रुग्ण आढळले आहेत तर सात जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. या आजाराचा प्रादुर्भाव जास्त होऊ नये व यावर नियंत्रण यावे यासाठी सर्वेक्षण, प्रतिबंध व आवश्यक उपाययोजना अशा त्रिसूत्रीचा अवलंब करण्यात येत आहे, आरोग्य विभागाने म्हटले आहे.
142 रुग्ण आणि सात मृत्यू
आतापर्यंत स्वाइन फ्लूचे 142 रुग्ण आढळले असून यामध्ये सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेल्यांमध्ये कोल्हापुरातून तीन आणि पुणे आणि ठाण्यात प्रत्येकी दोघांचा मृत्यू झाला आहे.
तर एकूण 142 रूग्णांमध्ये पुण्यात 23, पालघर मध्ये 22, नाशिक मध्ये सतरा, मुंबई 43, नागपूर आणि कोल्हापूर मध्ये प्रत्येकी 14 व ठाण्यात सात रुग्ण आढळले आहेत.
Published on: 23 July 2022, 04:23 IST