Health

माणूस कुठल्याहीगोष्टी करतो तेव्हा त्याची एक पद्धत असते. कधी कधी एकच गोष्ट दोन किंवा तीन पद्धतीने केले जाते. परंतु यामध्ये एखादी पद्धत थोड्या प्रमाणात नुकसान दायक असते तरदुसरी पद्धत फायदेशीर ठरते.

Updated on 24 April, 2022 9:45 PM IST

माणूस कुठल्याहीगोष्टी  करतो तेव्हा त्याची एक पद्धत असते. कधी कधी एकच गोष्ट दोन किंवा तीन पद्धतीने केले जाते. परंतु यामध्ये एखादी पद्धत  थोड्या प्रमाणात नुकसान दायक असते तरदुसरी पद्धत फायदेशीर ठरते.

हेच तत्व खाण्याच्या आणि पिण्याच्या बाबतीत देखील लागू होते. आता आपण यामधील पाणी पिण्याच्या सवयी चा विचार करु. पाणी पिताना बरेचजण वरून पाणी पितात, घाईघाईत चालत चालत किंवा उभे राहून पाणी पितात. तर काही जण आरामात बसून पाणी पितात. परंतु या पाणीपिण्याच्या सवयी मध्ये बसून पाणी पिण्याची सवय शरीरासाठी  खूपच फायदेशीर आहे. या लेखामध्ये आपण बसून पाणी पिण्याच्या सवयी मुळे काय फायदे होतात, हे जाणून घेणार आहोत.

 बसून पाणी पिण्याचे फायदे

1- मूत्रपिंडांच्या आरोग्य उत्तम राहते- मूत्रपिंड हे आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. जेव्हा आपण पाणी पिताना ते बसून पितो तेव्हा त्यातील एक एक घोट पाणी पिल्यानंतर आपल्या ब्लॅडर मध्ये साचलेले टाकाऊ पदार्थ साफ होतात मूत्रपिंडाचे कार्य चांगल्या पद्धतीने चालते.

2- फुफ्फुसे निरोगी राहतात - जेव्हा आपण उभे राहून पाणी पितो त्याचा विपरीत परिणाम लंग्स वर ही होऊ शकतो. अंन्ननलिका आणि श्वास नलिका यांना होणारा ऑक्सिजनचा पुरवठा थांबू शकतो. जेव्हा आपण बसून पाणी पितो तेव्हा लंग्स निरोगी राहतात.

3- तहान भागवण्याचे काम पूर्ण होते - शारीरिक क्रियांसाठी पाण्याची आवश्यकता आहे. मनुष्य अन्नाशिवाय जगू शकतो परंतु पाण्याशिवाय जगण्याची शक्यता खूपच कमी असते. शरीरातील 70 टक्के पाण्याच्या प्रमाणात एक टक्क्याने पाण्याचे प्रमाण कमी झाले तर तहान लागते. जेव्हा आपण बसून पाणी पितो तेव्हा आपल्या मेंदूला शरीराची पाण्याची आवश्यकता पूर्ण झाल्याचे स्पष्ट संकेत मिळतात. पण जेव्हा आपण उभे राहून पाणी पितो तेव्हा तहान पुरेशी  भागत नाही.

4- त्वचेला चकाकी येते- शरीराला पुरेसे पाणी मिळाले तर कुठलेही त्वचारोग होण्याची शक्यता खूप कमी असते. आपण बसून शांतपणे पाणी पीत होते व शरीराची पाण्याची गरज पूर्ण होते आणि आपली त्वचा देखील उजळते.

5- पचनक्रिया चांगली राहते- उभे राहून पाणी पितो तेव्हा दाबासकट पाणी पोटामध्ये जाते पाण्याचा वेग जास्त असल्याने पोट, आजूबाजूची जागा आणि आपल्या पचनक्रियेवर वाईट परिणाम होतो.

हे जर टाळायचे असेल तर पाणी पिताना नेहमी बसून एक एक घोट शांतपणे प्यावे त्यामुळे पचनक्रिया देखील सुधारते.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:शॉर्ट टर्म मध्ये चांगले उत्पन्न हातात देणारे पीक आहे चवळी; उन्हाळी चवळी लागवड ठरेल फायदेशीर

नक्की वाचा:उकाडा वाढणार! या आठवड्यामध्ये पुन्हा येणार उष्णतेची लाट, एप्रिल महिना ही तापणार

नक्की वाचा:बेरोजगारांसाठी आशेचा किरण घेऊन येत आहे सरकारचा हा उपक्रम, ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात

English Summary: sit and drink water this habbit is benificial for health
Published on: 24 April 2022, 09:45 IST