Health

अनेकांना वजन वाढल्यामुळे अनेक अडचणींचा आणि अनेक आजारांचा सामना करावा लागतो. असे असताना यावर उपाय म्हणून अनेकजण वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. आता यावर अगदी घरगुती उपाय केल्यास आपले वजन कमी होऊ शकते. यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे. अनेकांचे वजनही कमी झाले आहे.

Updated on 29 May, 2022 2:07 PM IST

अनेकांना वजन वाढल्यामुळे अनेक अडचणींचा आणि अनेक आजारांचा सामना करावा लागतो. असे असताना यावर उपाय म्हणून अनेकजण वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. असे असताना आता यावर अगदी घरगुती उपाय केल्यास आपले वजन कमी होऊ शकते. यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे. अनेकांचे वजनही कमी झाले आहे.

आता लिंबूपाणी हे लठ्ठपणा कमी करण्यासाठी खुप फायदेशीर असल्याचे समोर आले आहे. योग्य पद्धतीने घेतलेले लिंबूपाणी (Lemonade )लवकरात लवकर वजन कमी करण्यास मदत करते. लिंबूमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. जे वजन कमी करण्यासाठी काम करतात. तसेच त्यात पोषक तत्व असल्याने ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. तुम्ही उपाशी पोटी लिंबूपानी घेतले तर तुम्ही वजन कमी करु शकतात.

तसेच सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून, त्यात एक चमचा मध घाला. या पेयाचे नियमित सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते. तसेच लिंबू आणि पुदिन्याचा पानी वजन कमी करण्यास मदत करते. यासाठी एका ग्लास पाण्यात लिंबाचा रस घालून, त्यात पुदिन्याच्या पानांचा रस घाला. त्यात थोडे काळे मीठ टाका. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करा. याचा देखील तुम्हाला फायदा होईल.

श्रीलंकेनंतर अजून एक देश आर्थिक संकटात, अन्नधान्यही संपले, भारताकडे मदतीची मागणी

तसेच भूक कमी लागण्यासाठी आले सोबत लिंबु पाणी फायदेशीर आहे. यासाठी एक ग्लास पाण्यात लिंबाचा रस आणि आल्याचा रस मिसळा. त्यात काळे मीठ टाका. हे पाणी तुम्ही दिवसातून २ ते ३ वेळा पिऊ शकता. हे पेय प्यायल्यानंतर तुम्हाला भूक कमी लागते. यामुळे तुमच्या वजनावर तुमचे नियंत्रण राहू शकते. तसेच तुम्हाला आरोग्याच्या इतर तक्रारी देखील कमी जाणवतील.

महत्वाच्या बातम्या;
यंदा 42 हजार कोटींची एफआरपी FRP, विक्रमी गाळपामुळे विक्रमी वाढ
वाढलेले दुधाचे दर केंद्राला बघवेनात, केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे दूध दरात कपात
अतिरिक्त उसावर आता प्रशासनही हतबल, आता ऊस फडातच राहणार? पहा आकडेवारी

English Summary: Reduce obesity in just eight days, good news for those who want to lose weight after research
Published on: 29 May 2022, 02:07 IST