आजकाल चांगल्या आरोग्यासाठी किंवा शरीर धष्टपुष्ट करण्यासाठी प्रोटीन पावडर खाण्याची क्रेझ वाढली आहे. नियमित व्यायामासह, फिटनेस शिक्षक प्रोटीन पावडर किंवा प्रथिनयुक्त पदार्थ खाण्याचा सल्ला देतात. कंपन्यांकडून बाजारात प्रोटीन पावडर विकणे साठी असतात, पण काहीवेळा ती आरोग्यासाठी तसेच लोकांच्या शरीरासाठी घातक ठरतात.
प्रोटीन पावडरमध्ये भेसळ केल्यामुळे काही वेळा चांगला फायदा मिळत नाही. या व्यतिरिक्त ती खूप महाग आहेत. हार्वर्ड विद्यापीठातील डॉक्टरांच्या मते, कधीकधी प्रोटीन पावडर मानवी शरीरासाठी हानीकारक ठरते. त्यामुळे, अस्वस्थ पोट, पोटात वायू, हार्मोनल यांचे असंतुलन या सारखे दुष्परिणाम होऊ शकतात. अशा परिस्थितीत, चांगली उत्तमप्रकारची प्रोटीन पावडर घरच्या घरी बनवली जाऊ शकते.
प्रोटीन पावडर घरच्या घरी कशी तयार करावी:-
प्रोटीन पावडर फारच कमी वेळात बनवता येते. यत्यासाठी शंभर ग्रॅम बदाम, सोयाबीन, शेंगदाणे आणि मिल्क पावडर घ्या आणि मिक्सरमध्ये चांगली बारीक वाटून घ्या. वाटल्यास ,त्यात थोडी अळशी घालू शकता. ती सांधे मजबूत करते. या पावडरमधून एकशे वीस ते एकशे तीस कॅलरी मिळू शकते .
हेही वाचा:काळ्या तांदळाचे सेवन आहे आरोग्यासाठी फायदेशीर
प्रोटीन पावडर कशी वापरावी:-
एक ग्लास दुधात सकाळआणि संध्याकाळ प्रोटीन पावडर टाकून पिणे फायदेशीर आहे. आपण दुधामध्ये पाच ते सहा चमचे प्रोटीन पावडर टाकु शकते.
वाढती मुले:-
वाढत्या मुलांसाठी प्रोटीन पावडर घेणे खूप महत्वाच आहे, कारण त्यांचे शरीर विकसनशील अवस्थे मध्ये आहे. त्यांच्या नवीन पेशी तयार होऊ लागतात. अशा वेळेत ही प्रथिने त्यांना मदत करतात. सकाळी तीन ते चार चमचे प्रोटीन पावडर मुलांना देऊ शकता.
वृद्धा लोक:-
वृद्ध माणसाची हाडे वयोमानानुसार अशक्त होतात, म्हणून शरीरा साठी प्रोटीन आवश्यक असते . वृद्धांनी रोज तीन ते चार चमचे प्रोटीन पावडर दुधासह घेतल्याने अशक्तपणा होतो .
वयाच्या चाळीशी नंतर:-
वय 40 नंतर, शरीरात अशक्तपणा येऊ लागतो. स्नायू कमकुवत होतात. अशा स्थितीत तरुणांनीही रोज प्रोटीन पावडर सेवन करावी. यामुळे शरीराची चयापचय शक्तीत वाढ होतेतब्येत सुधारण्यासाठी, पद्धतशीरपणे त्यावर काम करणे महत्वाचं आहे. आपल्या रोजच्या दिनक्रम मध्ये पौष्टिक आहाराचा समावेश असणे फार महत्वाच आहे, ज्यात जीवनसत्त्वे, प्रथिने आणि इतर मुख्य घटक समाविष्ट असतात.
Published on: 30 June 2021, 12:10 IST