गेल्या अनेक दिवसांपासून देश कोरोनाशी लढत असताना आता सर्व सुरळीत चालू आहे. यामध्ये अनेकांचे जीव गेले. असे असताना अजून एक संकट समोर आले आहे. काही दिवसांत राज्यासह मुंबईत गोवरच्या रुग्णांची संख्या वाढली आहे.
यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. आता महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात आली आहे. असे असताना आता पुण्यात रुग्ण सापडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या पुण्यात (Pune) गोवरचे (Measles) पाच रुग्ण आढळले आहेत. यामुळे आता प्रशासन सतर्क झाले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील कुदळवाडी या भागात पाच गोवरचे रुग्ण आढळले. यामुळे आता पुढील काळात यामध्ये अजून रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. एकाच परिसरात गोवरच्या रुग्णांची संख्या वाढल्याने महापालिका दक्ष झाली आहे.
शेतकऱ्यांना ही बँक काहीही गहाण न ठेवता देतेय कर्ज, दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांना सुवर्णसंधी..
पिंपरी-चिंचवडमधील कुदळवाडी परिसरात 29 संशयित रुग्ण आढळले होते. या सगळ्यांची रक्त तपासणी करण्यात आली आहे. त्यातील पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे याठिकाणी अजून काही रुग्ण आहेत का? याची माहिती घेतली जात आहे.
आता सर्वसामान्यांसाठी राष्ट्रपती भवन खुले, अनेकांचे स्वप्न होणार पूर्ण..
राज्यभरात अनेक शहरात गोवरचे रुग्णदेखील वाढत आहे. मात्र त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबादारी प्रशासनाने घेतली आहे. त्यासाठी लसीकरण आणि बुस्टर डोस जास्त प्रमाणात देण्याची गरज आहे. त्यामुळेच गोवर रोखण्यास मदत होणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या;
दहा ते चौदा महिन्यात १०० ते ११० टन उत्पादन, उसाच्या नवीन जातीचा लागला शोध
ब्रेकिंग! राज्यातील दोन जिल्ह्यात सापडल्या सोन्याच्या खाणी
कायदा करायचा झाल्यास ग्रामपंचायत ते संसदेपर्यंतची लढाई आता रस्त्यावर सुध्दा लढणार
Published on: 02 December 2022, 12:57 IST