Health

कोरोना भारतामध्ये तरी खूप प्रमाणात कमी झाला असून आतासगळी परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.सगळे दैनंदिन व्यवहार सुरू करण्यात आले असून आर्थिक घडी देखील आता पूर्वपदावर येताना दिसत आहे.

Updated on 20 May, 2022 12:51 PM IST

कोरोना भारतामध्ये तरी खूप प्रमाणात कमी झाला असून आतासगळी परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.सगळे दैनंदिन व्यवहार सुरू करण्यात आले असून आर्थिक घडी देखील आता पूर्वपदावर येताना दिसत आहे.

 जगातील काही देशांमध्ये अजूनही कोरोना च्या वेगवेगळ्या व्हेरीअन्टने थैमान घातले असून बऱ्याचराष्ट्रांमधील काही शहरांमध्ये लॉक डाऊन आहे. याच पार्श्वभूमीवर भारतामधून देखील एक चिंता वाढवणारी बातमी समोर येत असून ओमायक्रोन व्हेरिएंटच्या BA.4 सब व्हेरीअन्टने शिरकाव केला असून देशातील पहिला रुग्ण हैदराबाद मध्ये सापडला आहे. 

Covid-19 जिनॉमिक सर्वलेन्स प्रोग्रामच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे. भारताच्या SARS-CoV-2 काँसॉर्टींयम ऑन जिनोमिक्सशी संबंधित शास्त्रज्ञांनी याबाबत सांगितले की भारतातील या व्हेरिएंटची नोंद 9 मे रोजी GISAIDवर करण्यात आली आहे.हाच स्ट्रेन दक्षिण आफ्रिकेतील कोरोना च्या मोठ्या लाटेसाठी कारणीभूत ठरला होता. हा स्ट्रेन संसर्ग आणि लसीकरणामुळे मिळालेल्या रोगप्रतिकारक क्षमतेला देखील प्रभावित करण्यास सक्षम आहे.

 तज्ञांच्या मते या वर्षी जानेवारीत भारतात आलेल्या ओमिक रॉनच्या व्हेरीयेन्ट लाटेमुळे भारतातील लोकांमध्ये चांगले आणि व्यापक प्रमाणातरोगप्रतिकारक रिस्पॉन्स पाहायला मिळाला. त्यामुळे आपल्याकडे याच्या संक्रमणाची शक्यता कमी आहे.सीएनबीसी च्या मते,कोरोनाचा WHO मधील टेक्निकल प्रमुख मारिया वान केरखोव यांच्यामध्ये कमीत कमी 16 देशात  या व्हेरिएंटची सातशे प्रकरणेनोंदवली गेली आहेत व BA.5चे तीनशेपेक्षा अधिक प्रकरण-17 देशात आहेत.

कोरोनाचे हे सब व्हेरी हंट अधिक संसर्गजन्य असून तिथे घातक ठरले नाही.येणाऱ्या दिवसांमध्ये कोरोना च्या प्रकरणांमध्ये जास्त वाढ होण्याचे कुठल्याही प्रकारची शक्यता नसून गंभीर लक्षणांमुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील कमीच राहील असे नॅशनल सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल शी संबंधित अधिकार्‍यांनी सांगितले.

 

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:Monsoon Updates: आला आला रे आला मान्सून आला ! कोकणातील मान्सूनची तारीख ठरली..!

नक्की वाचा:अन्नधान्य उत्पादनात वाढ: कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने 'या' प्रमुख कृषी पिकांच्या उत्पादनाचा आगाऊ अंदाज केला जारी

नक्की वाचा:'या' केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तब्बल 14 टक्के वाढ आणि मिळणार 10 महिन्याची थकबाकी

English Summary: new corona veriant of omicron b4 thats first patiant find out in hydrabad
Published on: 20 May 2022, 12:51 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)