Health

मातीचे अनेक प्रकार आहेत यामध्ये काळी, लाल, पिवळी, गाळाची माती, जांभी या माती वेगवेगळ्या ठिकाणी आढळून येतात आणि त्यांचे सर्वांचे गुण वेगवेगळे आहेत. काळ्या मातीचा विचार केला तर ती सगळ्यात जास्त उपजाऊ असते. काळी माती पठारावर अ जास्त आढळून येते.

Updated on 05 May, 2022 6:10 PM IST

मातीचे अनेक प्रकार आहेत यामध्ये काळी, लाल, पिवळी, गाळाची माती, जांभी या माती वेगवेगळ्या ठिकाणी आढळून येतात आणि त्यांचे सर्वांचे गुण वेगवेगळे आहेत. काळ्या मातीचा विचार केला तर ती सगळ्यात जास्त उपजाऊ असते. काळी माती पठारावर असलेल्या शेतजमिनीत सगळ्यात जास्त आढळून येते. काळ्या मातीला रेगुर माती, चिकण माती, कापसाची माती अथवा लावा माती पण म्हटलं जातं. सोबतच काळ्या मातीत औषधी गुण भरपूर प्रमाणात आहेत.

आजही आयुर्वेदामध्ये अनेक आजारांवर मातीचा लेप लावून उपचार केले जातात. यामध्ये प्रामुख्याने काळ्या मातीचा उपयोग जास्त प्रमाणात होतो, आपलं शरीर पंचतत्वांनी बनलं असल्याचे आयुर्वेदात म्हटले आहे.  त्यापैकी एक तत्व म्हणजे माती आहे.

मातीमध्ये लोह तसेच अनेक प्रकारचे पोषण तत्व आढळतात जे धान्याच्या रूपांनी आपल्या शरीरात जातात.  आणि आपले शरीर सदृढ करण्यात सहाय्य करतात. म्हणूनच काळ्या मातीला आयुर्वेदात आरोग्यासाठी लाभदायक मानलं गेलं आहे. काळ्या मातीत लोहाचं प्रमाण अधिक असतं त्यामुळे काळ्या मातीचा रंग काळा असतो. याशिवाय काळ्या मातीत टिटेनिफेरस मॅग्नेटाइड हे द्रव्य आढळून येते. शरीरात रक्त निर्माण करण्यात लोह मुख्य भूमिका निभावतं.

त्यामुळे ज्याच्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असते त्यांच्यासाठी काळ्या मातीचा उपचार लाभदायक ठरतो.काळ्या मातीनं शरीरातील अनेक व्याधी दूर केल्या जाऊ शकतात. काळी माती तुमच्या सौंदर्यासाठी उपयुक्त असते. काळी माती शरीरातील घाण शोषून घेते आणि शरीराला थंड ठेवण्याचं काम करते. त्यामुळे काळ्या मातीतील द्रव्ये शरीराच्या त्वचेसाठी लाभदायक असतात.

काळी माती डोळ्याच्या आरोग्यासाठीही महत्वाची असते. डोळ्यात जर जळजळ होत असेल तर ती दूर करण्यासाठी काळी माती लाभदायक आहे. काळ्या मातीचा लेप स्वच्छ पाण्यासोबत काही काळ डोळ्यांवर लावा. त्यानंतर धुवून टाका. त्याने डोळ्यात होणारी जळजळ दूर होते आणि डोळ्यांना थंडावा मिळतो तसेच आराम मिळतो. जर कोणाला ताप आला असेल तर रुग्णाच्या पोटावर ओली पट्टी बांधावी आणि तिला वारंवार बदलत राहावं.  

पण जर रुग्ण थंडीनं थरथरत असेल तर मात्र काळ्या मातीच्या पट्टीचा उपयोग करणे योग्य नाही. काळ्या मातीचा उपयोग पोटाचे आजार जसं हगवण, पोटदुखी, अतिसार झाला तर केला जाऊ शकतो. यात ओटी पोटावर काळ्या मातीची पट्टी बांधल्याने त्रास कमी होतो. संधिवात कमी करण्यासाठी पण अशी पट्टी बांधणं लाभदायक आहे. मासिक पाळीत होणाऱ्या वेदना देखील यानं कमी होतात. गर्भाशया संबंधी सगळ्या दोषांचं निवारण काळ्या मातीची पट्टी बांधल्यानं दूर होते. पण गर्भवती महिलांनी कधीही ओटीपोटावर काळ्या मातीची पट्टी बांधू नये. काळ्या मातीचे अनेक लाभ आहेत, ते आपण या लेखातून पहिले आहेत.

महत्वाच्या बातम्या
डाळिंब फळ प्रक्रिया आणि फायदे...
पाच वर्षात नव्हे एवढा भाव! घरातील अत्यावश्यक जिऱ्याचे भाव गगनाला, ही आहेत त्यामागील प्रमुख कारणे

English Summary: Multicolored black soil; It is beneficial for health
Published on: 04 May 2022, 01:13 IST