Health

लिंबूचे आपण नेहमी सेवन करत असतो. चवीला आंबट असणारा लिंबू आरोग्यासाठी विशेष फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. याचे फायदे आपल्या सर्वांना माहीतच आहेत. लिंबू पाणी आपल्या शरीरातील घाण साफ करते. लिंबू मध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंट गुणधर्मांमुळे आपली त्वचा चमकू लागते.

Updated on 02 April, 2022 10:11 PM IST

लिंबूचे आपण नेहमी सेवन करत असतो. चवीला आंबट असणारा लिंबू आरोग्यासाठी विशेष फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. याचे फायदे आपल्या सर्वांना माहीतच आहेत.  लिंबू पाणी आपल्या शरीरातील घाण साफ करते. लिंबू मध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंट गुणधर्मांमुळे आपली त्वचा चमकू लागते.

लिंबाचा सर्वाधिक वापर वजन कमी करण्यासाठी केला जातो. पण, तुम्हाला माहित आहे का लिंबाची साल देखील खूप उपयुक्त आहे. ऐकून शॉक बसला ना पण हे सत्य आहे लिंबूची साल देखील आरोग्यासाठी गुणकारी आहे. चला तर मग जाणून घेऊया लिंबाच्या सालीचे कोणते फायदे आहेत.

लिंबाची साल वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आहे खूप फायदेशीर 

आयुर्वेदानुसार, लिंबाची साल वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. अनेक संशोधनात असे आढळून आले आहे की, लिंबाच्या सालीमध्ये पॉलिफेनॉल आढळतात, जे शरीराचे वजन कमी करण्यास उपयोगी असतात.

हाडे मजबूत ठेवण्यासाठी उपयोगी 

आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी हाडे मजबूत ठेवणे महत्त्वाचे असते. हाडे मजबूत असले की आरोग्य सुदृढ राहते. तज्ञांच्या मते, मजबूत हाडांसाठी कॅल्शियमची खूप गरज असते आणि लिंबाच्या सालीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त आढळते.  कॅल्शियम हाडे तयार करण्यास तसेच त्यांना मजबूत आणि विकसित करण्यास मदत करते. म्हणुन लिंबाची साल हाडांच्या मजबुतीसाठी खूप फायदेशीर मानली जाते.

रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी विशेष कारगर 

लिंबाच्या सालीचा वापर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी केला जातो. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लिंबाची सांग खूप फायदेशीर ठरते. लिंबाच्या सालीमध्ये व्हिटॅमिन-सी आढळते, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीचे कार्य सुधारते.  यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते.

संबंधित बातम्या:-

English Summary: Lemon peel is also good for health; What is truth
Published on: 02 April 2022, 10:11 IST