Health

आपल्या रोजच्या आहारात आपण सीताफळ खाणे आपल्याला खूप फायद्याचे आहे. आपल्या आरोग्यासाठी सीताफळ खाणे खूप चांगले असते जे की सीताफळ हे फळ खाण्यास सुद्धा खूप चविष्टदार असते. आपल्याला जर पित्त, वात, रक्तदाब तसेच हृदयासाठी खूप पोषक आहे. आपल्याला जो वात येतो तो घालवण्यासाठी सीताफळ हे फळ खूप फायद्याचे असते तसेच कमी होण्यास सुद्धा मदत होते.

Updated on 23 July, 2021 8:24 PM IST


आपल्या रोजच्या आहारात आपण सीताफळ खाणे आपल्याला खूप फायद्याचे आहे.आपल्या आरोग्यासाठी सीताफळ खाणे खूप चांगले असते जे की सीताफळ हे फळ खाण्यास सुद्धा खूप चविष्टदार असते आपल्याला जर पित्त, वात, रक्तदाब तसेच हृदयासाठी खूप पोषक आहे. आपल्याला जो वात येतो तो घालवण्यासाठी सीताफळ हे फळ खूप फायद्याचे असते तसेच कमी होण्यास सुद्धा मदत होते.

केसांसाठी फायदेशीर:

अगदी लहान मुलांचे केस सुद्धा पांढरे व्हायला लागले आहेत आणि आपण तेच केस कलर करण्यासाठी वेगवेगळ्या केमिकल्स चा वापर करतो पण त्याच ऐवजी जर तुम्ही केमिकल्स चा वापर न करता जर आहारात सीताफळाचा वापर केला तर तुमचे केस गळणे तसेच केस पांढरे सुद्धा होऊ शकत नाहीत पण त्यासाठी तुम्हाला सीताफळ खावावे लागेल. धावपळीच्या जीवनात आपल्या केसांवर आपले लक्ष नाही त्यामुळे केसांना होणाऱ्या इजा जसे की केस पांढरे पडणे तसेच केस गळणे व टक्कल होणे इ. परिस्थितीना सामोरे जावे लागत आहे. तुमचे जर जास्त प्रमाणात केस गळत असतील तर तुम्ही एक उपाय करा तो म्हणजे सीताफळाच्या बिया घ्या आणि त्या बिया बकरीच्या दुधामध्ये उगाळून लावा असे केल्याने तुमचे केस गळणे बंद होईलच पण त्याच प्रमाणे तुमच्या डोक्यावर नवीन केस सुद्धा येण्यास सुरू होईल.

हेही वाचा:जाणून घ्या कोणती आहेत शरीराला आरोग्यदायी पेये

चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होणे:

धावपळीच्या जीवनात खूप लोकांच्या अशा तक्रारी येत आहेत की चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासाठी कोणते उपाय करावेत जे की आपण पिंपल्स घालवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल्स चा वापर करतो पण तरीही त्याचा काही उपयोग होत नाही. तुम्हाला जर तुमचा चेहऱ्यावरील पिंपल्स घालवायचे असतील तर तुम्ही सीताफळाच्या पानांचा लेप चेहऱ्यावर लावा यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स चे प्रमाण कमी होईल.

ब्लडप्रेशर पासून सुटका :

कोणत्या न कोणत्या ताण तणावामुळे लोकांना ब्लडप्रेशर ची समस्या उदभवायला सुरू होते, आपण कोणत्याही गोष्टीला घाबरलो की आपला ब्लडप्रेशर हाय किंवा लो होतो. तुम्ही जर रोज एक सीताफळ खाल्ले तर ब्लडप्रेशर पासून तुमची सुटका होऊ शकते.

अशक्तपणा दूर होणे:

जेव्हा आपण आजारी पडतो त्यावेळी आपल्याला अशक्तपणा येण्यास सूरी होते किंवा कोणतेही काम केले तर आपल्याला थकवा सुद्धा यायला सुरू होते पण आपण जर सीताफळ खाल्ले तर आपल्या शरीरात पुरेशी ऊर्जा तयार होते आणि आपली अशक्तपणा पासून सुटका होते.

ज्या लोकांना कोणत्याही गोष्टीची मनात भीती निर्माण होत असेल आणि हृदयाचे ठोके जर वाढत असतील तर त्यांनी आपल्या आहारात सीताफळ घ्यावे त्यामुळे आपल्याला भीती वाटत नाही आणि हदय सुद्धा सुरक्षित राहते.

English Summary: Learn the health benefits of eating custard apple
Published on: 23 July 2021, 08:24 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)