छातीमध्ये वेदना व्हायला लागल्या की आता हृदयविकाराचा झटका येतो की काय म्हणून घबराट निर्माण होते. पण डॉक्टरांचे वारंवार असे सांगणे आहे की छाती दुखणे म्हणजे हृदयविकारच होणे असे समजण्याचे काही कारण नाही. इतरही कारणाने छाती दुखू शकते. पित्त वाढल्याने सुध्दा छाती दुखते. ही छाती दुखणे म्हणजे वेदना नसतात. तर छातीत जळजळ करायला लागते. पोटातील आम्ल उलट्या दिशेने वर सरकायला लागते आणि ते छातीपर्यंत येऊन छातीत जळजळ व्हायला लागते.
अशा वेळी छातीत होणाऱ्या वेदना म्हणजे हृदयविकार नव्हे. त्यांना घाबरण्याचे काही कारण नाही. दुसरी गोष्ट म्हणणे आपल्या क्षमतेपेक्षा अधिक वजन उचलण्याचा प्रयत्न केला तरीही छातीत वेदना होतात. या वेदना स्नायूला होत असतात. कारण वजन उचलण्याचा ताण स्नायूवर आलेला असतो. हृदयाचेही दुसरे काही विकार असतात. हृदयाचा प्रत्येक विकार म्हणजे अटॅकच नव्हे.
हे ही वाचा- लाकडी घाणा तेल खाऊयात निरोगी राहुयात
तेव्हा हृदयविकाराला सोडून हृदयाची इतर दुखणी होतात तेव्हाही छाती दुखू शकते.
न्युमोनिया झाल्यानंतरसुध्दा छातीत वेदना होऊ शकतात. हा विकार सर्दी बरोबरच यकृतात जंतू संसर्ग झाल्यामुळे होतो आणि त्यामुळे छातीत वेदना होऊ शकतात. न्युमोनियामध्ये कफ, ताप आणि खोकला एकदम होतो आणि छाती दुखते. जास्त दगदग झाल्याने सुध्दा छातीत दुखू शकते. त्यामुळे वरील कारणाने होणाऱ्या छातीतल्या वेदना आणि हृदयविकाराच्या झटक्याच्या वेळी होणाऱ्या वेदना यातला फरक लक्षात घेतला पाहिजे.
हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा होणाऱ्या छातीतल्या वेदना वेगळ्या असतात. अशावेळी छाती वरवर दुखत नाही. तर आतून प्रचंड वेदना होतात. त्या वेदनांचा त्रास घसा, हाताचे दंड आणि एवढेचे नव्हे तर जबड्यांनाही होतो. होणाऱ्या छातीतल्या वेदना आणि हृदयविकाराच्या झटक्याच्या वेळी होणाऱ्या वेदना यातला फरक लक्षात घेतला पाहिजे. अशा वेळी काळजी घेणे गरजेचे असते. व लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवावे.
Nutritionist & Dietitian
Naturopathist
Amit Bhorkar
whats app: 9673797495
Published on: 28 April 2022, 06:59 IST