Health

आपल्या आयुष्यामध्ये बेल अतिशय लाभदायी आहे.

Updated on 17 September, 2022 9:52 PM IST

आपल्या आयुष्यामध्ये बेल अतिशय लाभदायी आहे. बेलाच्या पानांचा रस काढून दिवसाला दोन वेळा घेतल्यास मधुमेहापासून मुक्तता मिळविणे शक्य आहे.रोज याचे सेवन केल्यास याचा फरक दिसून येतो.पोटात समस्या निर्माण झाल्यास तोंडाला फोड येतात.अशा परिस्थितीत बेलाचा गर उकळून गुळण्या केल्यास ही समस्या दूर होऊ शकते.

अपचनापासून मुक्ती पोटाच्या दुखण्यांवर बेलाचे फळ रामबाण औषध आहे.Relief from indigestion Bela fruit is a panacea for stomach aches. बहुतांश रोगांची सुरुवात पोटापासून होत असते. बेलाच्या नियमित सेवनाने अपचनापासून कायमची मुक्ती मिळणे शक्य आहे.

हे ही वाचा - शेतकऱ्यांनो येणारे युग नक्की तुमचेच आहे! फक्त यावर लक्ष द्या

पुढचे मोठे आजार टाळणे शक्य आहे.रक्ताची कमतरता दूर होते - बदलत्या जीवनशैलीत अनेकांना रक्ताच्या कमरतेचे लक्षण दिसून येतात.

वाळलेल्या बेलाच्या गराचा पावडर तयार करून गरम दुधात मिश्रीसोबत रोज एक चम्मच घेतल्यास शरीरात नवीन रक्त तयार होण्यास सुरुवात होते. आपणास आरोग्यदायी अनुभव यायला लागतो.डायरियापासून बचाव -उन्हाळ्याच्या दिवसात डायरिया ही समस्या आता अधिकांश लोकांमध्ये दिसून येते. अलीकडे या रुग्णांचे प्रमाण विदर्भात वाढीस लागले आहेत. या परिस्थितीत उलट्या,

हगवण, मळमळ वाटू लागते. बेलाच्या पाण्यात साखर मिसळून प्यायल्यास याचे लाभ दिसून येतात. हे केल्यास आतून आरोग्यवर्धक अनुभव मिळतो.गर्भवती महिलांसाठी उपयुक्त गर्भवती महिलांना उलट्यांचा त्रास सर्वसामान्य मानला जातो. या त्रासापोटी अनेकदा जेवण बंद केले जाते. त्याचा परिणाम बाळावर होऊन पुढच्या त्रास वाढतो. या समस्येवर बेल सर्वोत्तम उपाय आहे. बेलाचा गर कुटून तांदळाच्या पाण्यासोबत त्याचा लगदा तयार करावा. नंतर त्याची छाननी करून प्यावे.

English Summary: Know these Ayurvedic benefits of Bela, you will save a lot of money!
Published on: 17 September 2022, 09:18 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)