Health

सध्या गेल्या काही दिवसांपासून कोरोना पुन्हा एकदा वाढू लागला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चीन आणि दुबईतून भारतात येणार्‍या प्रवाशांनी आपली कोरोना चाचणी करुन घ्‍यावी, अशी सूचना टास्‍क फोर्सच्‍या वतीने करण्‍यात आली अली आहे.

Updated on 31 March, 2023 11:49 PM IST

सध्या गेल्या काही दिवसांपासून कोरोना पुन्हा एकदा वाढू लागला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चीन आणि दुबईतून भारतात येणार्‍या प्रवाशांनी आपली कोरोना चाचणी करुन घ्‍यावी, अशी सूचना टास्‍क फोर्सच्‍या वतीने करण्‍यात आली अली आहे.

दरम्यान, देशात सलग तिसर्‍या दिवशी कोरोना रुग्‍णसंख्‍येत वाढ नोंदवली गेली. गेल्या २४ तासांत कोरोनाचे 2994 नवे रुग्ण आढळले आहेत. देशातील सक्रिय रुग्णसंख्या १६,३५४ वर पोहोचली आहे. यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे.

काल देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचे ३ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्‍यामुळे देशातील सक्रिय रुग्णसंख्या १५,२०८ वर पोहोचली होती. यामुळे आता आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.

कांदा अनुदानासाठी 'या' तारखेपर्यंत मुदत, असा करा अर्ज..

दरम्यान, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) या संस्थेने कोविडनंतर हृदयविकाराच्या घटनांबाबत अभ्यास सुरू केला आहे. यामध्ये कोविड आणि आणि हृदयविकाराचा झटका यांचा काही संबंध आहे का? हे शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

दरम्यान, कोरोना प्रकरणांमध्ये वाढ होत असताना यूपी सरकारही सक्रिय आहे. योगी आदित्यनाथ सरकारने सर्व आघाडीचे कर्मचारी आणि सरकारी आणि खाजगी रुग्णालयांना अलर्ट मोडमध्ये ठेवले आहे. राज्यात सर्व पॉझिटिव्ह नमुन्यांची जीनोम सिक्वेन्सिंगही केली जाईल, असे सरकारने म्हटले आहे. ज्या जिल्ह्यांतून पुष्टी झालेली प्रकरणे येत आहेत तेथे तातडीने कारवाई करण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत.

विहीर मंजूरीसाठी शेतकऱ्यांकडे पैशांची मागणी; सरपंचाने नोटांची उधळण करत केला राडा..

यासोबतच सरकारने अधिकाऱ्यांना सर्व जिल्ह्यांमध्ये इन्फ्लूएंझा, श्वसन संक्रमण यांसारख्या आजारांवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. दिल्लीचे आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले, आप सरकार राष्ट्रीय राजधानीतील कोविड-19 परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यासंदर्भात शुक्रवारी बैठक घेणार आहेत. रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी असेल तर घाबरण्याची गरज नाही.

शेतकऱ्यांनो जैविक कीड नियंत्रण
एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करा, मार्च एंड’मुळे बँका, सोसायट्या शेतकऱ्यांच्या मागे..
लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी मजूर महामंडळाचे कामकाज गतिमान करणे गरजेचे

English Summary: increase number corona patients! number patients 16 thousand, the test will be done at the airport..
Published on: 31 March 2023, 11:49 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)