Health

या प्येयाचे नियमित सेवन केल्याने आरोग्याला बरेच फायदेही होतील.

Updated on 31 May, 2022 6:26 PM IST

आजकाल प्रत्येकजण वजन कमी करण्यामागे धावत असतो जेणेकरून आपले आरोग्य निरोगी रहावे शिवाय आपली शरीररचना व्यवस्थित दिसावी. तर आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला अशा प्येय पदार्थाबद्दल सांगणार आहोत ज्याचा तुम्हाला वजन कमी करण्याबरोबरच इतर अनेक फायदेही होतील. या प्येयाचे नियमित सेवन केल्याने आरोग्याला बरेच फायदेही होतील.

आजकाल भारतासह संपूर्ण जगात लठ्ठपणा ही एक मोठी समस्या उध्दभवत आहे. तुम्हालाही याची जाणीव असायलाच हवी. कारण आजच्या काळात तुमच्या संपर्कात नक्कीच कोणीतरी असेल ज्याला त्याचे वजन कमी करायला आवडेल. तर हा लेख त्यांच्यासाठीच आहे.

जिरे पाण्याचे फायदे
जिऱ्याच्या पाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यात कॅल्शियम, पोटॅशियम, मॅंगनीज आणि सेलेनियम सारखी अनेक खनिजे आढळतात. तज्ज्ञांच्या मते, जिऱ्याच्या पाण्याचे नियमित सेवन केल्यास वजन कमी करण्यास मदत होईल. तसेच, हे पेय तुमच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.

कृषी केंद्रांवर कृषी विभागाची करडी नजर; आता 9 भरारी पथक करणार 'हे' काम

जिऱ्याचे पाणी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. तसेच त्वचेच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. जिऱ्याच्या पाण्याच्या सेवनाने अॅसिडिटी, गॅस आणि ब्लोटिंगपासून सुटका मिळते.याच्या नियमित सेवनाने चांगली झोप लागते.

जिरे पाणी पेय बनवण्याची योग्य पद्धत
सर्व प्रथम, तुम्ही २ चमचे जिरे आणि एक ग्लास पाणी घ्या. आता दोन्ही एकत्र मिसळा.यानंतर हे दोन्ही मिश्रण 10 मिनिटे उकळा. आता सामान्य तापमानाला थंड होण्यासाठी सोडा. आता तुम्ही थंड जिऱ्याच्या पाण्याची चव सहज चाखू शकता.

महत्वाच्या बातम्या:
राज्यात घडली हृदय पिटाळून टाकणारी घटना; वाघ्याच्या हल्ल्यात शेतकरी राजाचा मृत्यू
प्रतीक्षा संपली; मोदींनी पाठवलेले 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; नसतील आले तर करा 'हे' काम

English Summary: Healthy cumin water; Learn the process of making cumin water
Published on: 31 May 2022, 06:26 IST