Health

Health Tips: मित्रांनो अनेक लोकांना असं वाटतं की, जांभई येण्यामागे पुरेशी झोप न होणे, थकवा आणि कंटाळा ही मुख्य कारणे (Health News) असतात. असा समज जवळपास सर्व लोकांचा असतो. मात्र मित्रांनो याशिवाय जांभई येण्याची इतरही अनेक कारणे आहेत. शिवाय सतत जांभई येण्याने अनेक आरोग्यविषयक समस्यादेखील उत्पन्न होत असतात.

Updated on 01 July, 2022 5:33 PM IST

Health Tips: मित्रांनो अनेक लोकांना असं वाटतं की, जांभई येण्यामागे पुरेशी झोप न होणे, थकवा आणि कंटाळा ही मुख्य कारणे (Health News) असतात. असा समज जवळपास सर्व लोकांचा असतो. मात्र मित्रांनो याशिवाय जांभई येण्याची इतरही अनेक कारणे आहेत. शिवाय सतत जांभई येण्याने अनेक आरोग्यविषयक समस्यादेखील उत्पन्न होत असतात.

यामुळे सतत जांभई येण्याने आपल्या आरोग्यावर कोणते परिणाम होतात याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. शिवाय जांभई येण्याचे कोण-कोणती कारणे आहेत याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी.

हायपोथायरॉईड

जेव्हा हायपोथायरॉईडीझमची समस्या असते तेव्हा शरीर आवश्यक प्रमाणात थायरॉईड हार्मोन तयार करू शकत नाही.  ही एंडोक्राइन सिस्टमशी संबंधित समस्या आहे ज्यामध्ये थायरॉईड ग्रंथी पुरेसे थायरॉईड संप्रेरक तयार करत नाही.  त्यामुळे जांभईही सतत येत राहते.

झोपेची कमतरता

सर्वात प्रमुख आणि सामान्य कारण म्हणजे रात्रीची झोप कमी होणे. त्यामुळे लोक दिवसभर जांभई देतात. संसर्गजन्य रोगांशी लढण्यासाठी आपल्या शरीराला 7-8 तासांची झोप लागते. पुरेशी झोप न मिळाल्यास लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. याशिवाय झोपेच्या कमतरतेमुळे स्लीप एपनिया नावाच्या विकाराची समस्या देखील होऊ शकते, ज्यामुळे जांभई सतत येत राहते.

औषधाचे साईड इफेक्ट

मित्रांनो तज्ञांच्या मते, काही औषधांचे साईड इफेक्ट देखील सतत जांभई येण्याचे कारण असू शकतात. जास्त जांभई दिल्याने बद्धकोष्ठता, सूज येणे, जुलाब, चक्कर येणे आणि तोंड कोरडे पडणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.  त्यामुळे यापासून दूर राहायचे असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नका.

ताण

तणावाखाली शरीरात काही रसायने आणि हार्मोन्स वाढू लागतात. जास्त ताण घेतल्यानेही जास्त जांभई येऊ शकते.

हृदय समस्या

दुसरीकडे, सतत जांभई येणे देखील हृदयाच्या समस्या दर्शवते. खरं तर, जेव्हा शरीरात ऑक्सिजनची कमतरता असते तेव्हा रक्त पंप करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.

निश्चितचं सतत जांभई येण्याचे अनेक कारणे आहेत. यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कुठल्याही औषधाचे सेवन करू नये तसेच सतत जांभया येत असेल तर एकदा आपल्या डॉक्टरांचा अवश्य सल्ला घ्यावा. याशिवाय शरीराला पुरेशी झोप आवश्यक आहे यामुळे प्रत्येकाने रात्री कमीत कमी सात तास झोप घेणे अनिवार्य आहे.

English Summary: health tips yawning reasons and solution
Published on: 01 July 2022, 05:33 IST