Health

भारतीय स्वयंपाक घरातील एक प्रमुख मसाल्याचा पदार्थ म्हणून हळदीची ओळख आहे, हळद केवळ एक मसाल्याचा पदार्थ आहे असे नाही तर यामध्ये असलेले औषधी गुणधर्म त्याला आयुर्वेदिक महत्व प्राप्त करून देतात. हळदी मध्ये असलेले पोषक घटक हे मानवी शरीराला खूपच उपयोगी आहेत म्हणूनच की काय आयुर्वेदात हळदीला अनन्य साधारण महत्त्व दिले जाते.

Updated on 26 April, 2022 8:48 PM IST

भारतीय स्वयंपाक घरातील एक प्रमुख मसाल्याचा पदार्थ म्हणून हळदीची ओळख आहे, हळद केवळ एक मसाल्याचा पदार्थ आहे असे नाही तर यामध्ये असलेले औषधी गुणधर्म त्याला आयुर्वेदिक महत्व प्राप्त करून देतात. हळदी मध्ये असलेले पोषक घटक हे मानवी शरीराला खूपच उपयोगी आहेत म्हणूनच की काय आयुर्वेदात हळदीला अनन्य साधारण महत्त्व दिले जाते.

मित्रांनो आपण अनेकदा हळदीचे दूध प्राशन केले असेल, हळदीचे दूध अनेक विकारात विशेष फायदेशीर ठरते. पण मित्रांनो आपणास हळदीचा चहा आणि त्याचे फायदे ठाऊक आहेत का? नसतील तर मग आज जाणून घ्या हळदीचा चहा पिण्याचे आश्चर्यकारक फायदे.

हळदीचा चहा पिल्याने मिळणारे फायदे - रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते- मित्रांनो असे सांगितले जाते की, हळदीचा चहा पिल्याने मानवाची रोगप्रतिकार शक्ती अधिक मजबूत होते. म्हणूनच मित्रांनो जर आपण कोरोनासारख्या महाभयंकर परिस्थितीत दररोज एक कप हळदीचा चहा घेतला तर आपण कुठल्याही विषाणूजन्य संसर्गापासून सहजरित्या वाचू शकता कारण की आपली रोगप्रतिकारक शक्ती यामुळे अधिक मजबूत बनलेली असेल.

संबंधित बातम्या :-

Health Tips : काळी मिरी आणि लवंग खाण्याचे आश्चर्यकारक फायदे वाचा ; बसेल आश्चर्याचा धक्का

बापरे तंबाखू खाण्याचे आहेत ऐव्हढे फायदे, वाचून व्हाल थक्क

अंगदुःखी दूर करते- हळद ही वेदना कमी करणारी वेदनाशामक आयुर्वेदिक औषधी मानली जाते. त्यामुळे मित्रांनो जर आपणास अंगदुखीची समस्या असेल तर आपण नक्कीच हळदीचा चहा प्यावा. हा चहा प्यायल्याने अंग दुखण्यापासून आराम मिळत असल्याचा दावा आयुर्वेदात बघायला मिळतो.

कोलेस्ट्रॉल लेवल कमी करण्यास मदत करते - हळदीचा चहा मानवी हृदयासाठी खूपचं फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. असे सांगितले जाते की, हळदीमध्ये खुप अधिक अँटीऑक्सिडंट असतात, त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवता येते. म्हणून हळदीचा चहा प्यायल्याने हृदय निरोगी राहत असल्याचा दावा आयुर्वेदात बघायला मिळतो.

डोळ्यांसाठी आहे रामबाण- हळदीचा चहा डोळ्यांसाठी खूपचं फायदेशीर मानला जातो, कारण की, हळदीच्या चहामध्ये खुप अधिक जीवनसत्त्वे असतात. त्यामुळे याचे सेवन केल्यास डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. यासोबतच डोळ्यांची दृष्टीही अबाधित राहण्यास मदत होते. त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी हळदीचा चहा अवश्य पिला पाहिजे.

Disclaimer : सदर लेखात सांगितलेली विधी, पध्दती आणि दाव्यांचं Krishi Jagran Marathi कुठलंही समर्थन करत नाही. लेखात सांगितलेली माहिती केवळ एक प्राथमिक सल्ला आहे. अशा पध्दतीचा कोणताही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी आपल्या डॉक्टरांचा निदान एकदा सल्ला घेणे अनिवार्य राहणार आहे.

English Summary: Health Tips: This Ayurvedic tea cures many ailments; Read about it
Published on: 26 April 2022, 08:48 IST