Health Tips : पावसात समोसे (Samosa) खाणे प्रत्येकाला आवडते. पावसाच्या पाण्यात समोशाची चव अधिकचं द्विगुणित होते. पण मात्र समोसा खाणे आपल्या शरीरासाठी घातक आहे. याच्या सेवनाने मानवी शरीराला खूप नुकसान होते. त्यामुळे समोसे सहसा खाणे टाळा. मात्र खातच असाल तर याचे सेवन मर्यादित प्रमाणात करा.
जाणकार लोकांच्या मते, समोसा विशेषत: समोसा तळतात ते तेल अत्यंत विषारी असून ते आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहे. याशिवाय समोशाचे पीठही अनेक आरोग्य समस्यांना जन्म देऊ शकते.
त्यामुळे शक्यतो समोसे न खाण्याचा प्रयत्न करावा. मित्रांनो आज आपण समोसे खाल्ल्याने मानवी शरीराला कोणकोणते विकार होतात याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
तेलामुळे हृदयविकाराचा धोका
समोसा तेलात भरपूर फॅट असते. याशिवाय बाजारात मिळणारे समोसे अशा तेलात तळले जातात, जे पुन्हा पुन्हा गरम केले जातात. या प्रकारच्या तेलाचे सेवन केल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि ब्लॉकेजची समस्या उद्भवू शकते.
जास्त कॅलरीज
समोशामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप जास्त असते. अशा परिस्थितीत जर तुम्ही रोज समोसे खाल्ले तर तुमचा लठ्ठपणा खूप वाढू शकतो. तज्ञांच्या मते, 1 समोशामध्ये सुमारे 262 कॅलरीज असतात, जे की आपल्या शरीरासाठी जास्त असतात.
चरबी वाढण्याची समस्या
जास्त समोसे खाल्ल्याने शरीरातील चरबी लक्षणीयरीत्या वाढू शकते. यामध्ये ट्रान्स फॅट असते जे हृदयरोग, लठ्ठपणा इत्यादी अनेक समस्यांचे कारण आहे.
त्वचेचे नुकसान करते
बटाटा, मैदा आणि तेलाचा समोस्यांमध्ये भरपूर वापर केला जातो. या सर्व गोष्टी तुमच्या त्वचेसाठी आरोग्यदायी मानल्या जात नाहीत. याचे जास्त सेवन केल्याने त्वचेवर सुरकुत्या आणि मुरुम येऊ शकतात. समोसे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर नाही. त्यामुळे याचे सेवन मर्यादित प्रमाणात करा. याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, त्वचेचे आजार होऊ शकतात.
Published on: 25 September 2022, 08:45 IST