Health

सध्याच्या जीवनशैलीमुळे अनेकदा बाहेरचे जेवण होते. मात्र याचा परिणाम आरोग्यावर होत असतो. निरोगी शरीरासाठी योग्य आहाराचा वापर करणे तितकेच गरजेचे असते. मग अशा परिस्थितीत आहारात कोणत्या भाज्यांचा वापर करावा? याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

Updated on 06 October, 2022 12:37 PM IST

सध्याच्या जीवनशैलीमुळे अनेकदा बाहेरचे जेवण होते. मात्र याचा परिणाम आरोग्यावर होत असतो. निरोगी शरीरासाठी योग्य आहाराचा (Health) वापर करणे तितकेच गरजेचे असते. मग अशा परिस्थितीत आहारात कोणत्या भाज्यांचा वापर करावा? याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

फुलकोबी

काही भाज्यांमध्ये भरपूर प्रथिने असतात. अशा भाज्यांविषयी जाणून घेऊया. फुलकोबीत प्रथिने, कॅलरीज, मॅग्नेशियम आणि लोह (magnesium and iron) मुबलक प्रमाणात आढळते. हिवाळ्यात या भाजीचे उत्पादन केले जाते परंतु ती वर्षभर बाजारात उपलब्ध असते. मात्र ही भाजी रोज खाल्ली तर शरीरात प्रथिनांची कमतरता जाणवणार नाही.

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! बाजारात बाजरीची किंमत वाढली; विकली जातेय 'या' दराने

ब्रोकोली

ब्रोकोली (Broccoli) ही भाजी दिसायला कोबीसारखी असते. ही भाजी नेहमीच आरोग्यासाठी उत्तम अन्न मानली जाते. ही भाजी खाल्ल्याने केवळ प्रथिनेच नाही तर लोही मुबलक प्रमाणात मिळू शकते. त्यामुळे तुमच्या दैनंदिन आहारात याचा समावेश जरूर करा. स्नायू मजबूत होतील.

मोठी वेलची शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणार; शेतकरी होणार मालामाल

पालक

जेव्हा जेव्हा सर्वात आरोग्यदायी हिरव्या पालेभाज्यांचा (leafy vegetables) उल्लेख होतो तेव्हा पालक सर्वात वरती असतो. त्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन बी आणि फायबर देखील आढळतात, यामुळे तुमचे स्नायू मजबूत होतात.

मेष, सिंह, तूळ राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा; जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य

मशरूम

खूप कमी लोकांना हे माहित असेल की प्रथिनेयुक्त पदार्थ खाल्ल्याने शरीराची ( health body) प्रतिकारशक्ती देखील वाढू शकते. यासाठी तुम्ही रोजच्या आहारात मशरूमचा समावेश करू शकता. त्यामुळे तुम्हाला संसर्ग होण्याची शक्यता कमी आहे.

महत्वाच्या बातम्या 
Gold price today! सोने- चांदीच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या नवीन किंमती...
सर्वसामान्यांना सणासुदीच्या काळात मोठा फटका; गव्हाच्या किंमतीत 4 टक्यांनी वाढ
सावधान! राज्यातील 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

English Summary: Health Tips Eat 4 vegetables your daily diet Health perfect
Published on: 06 October 2022, 12:28 IST