Health

वैद्यकीय क्षेत्रात कायमच वेगवेगळ्या प्रकारचे शोध चालू असतात. विविध प्रकारचे आजार आणि त्यावरचे उपचार किंवा ओळखण्याच्या पद्धती संशोधक कायमच शोधत असतात. मानव वैज्ञानिक ताकदीच्या आधारे बऱ्याच गोष्टी साध्य करत असून त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खूप प्रगती होत आहे.

Updated on 07 July, 2022 12:26 PM IST

 वैद्यकीय क्षेत्रात कायमच वेगवेगळ्या प्रकारचे शोध चालू असतात. विविध प्रकारचे आजार आणि त्यावरचे उपचार किंवा ओळखण्याच्या पद्धती संशोधक कायमच शोधत असतात. मानव वैज्ञानिक ताकदीच्या आधारे बऱ्याच गोष्टी साध्य करत असून त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खूप प्रगती होत आहे.

याचा पुढचा टप्पा म्हणून सगळ्यांच्या परिचयाचे गुगल आता एक नवे उपकरण वैद्यकीय क्षेत्रात आणणार असून ते नक्कीच क्रांती करेल यात शंका नाही.

गुगलच्या या नव्या स्मार्ट वॉच मध्ये गुगल एक सेन्सर आणत असून ते सेन्सर च्या मदतीने तुमच्या हृदयगतीत होणारी हालचाल ओळखून तुम्हाला हार्ट ॲटॅक किंवा स्ट्रोकचा धोका निर्माण होणार असेल तर तो होण्याअगोदरच तुम्हाला त्या बाबतीत सावधान किंवा अलर्ट करेल.

नक्की वाचा:Almond Benifits: बदाम आहे आरोग्यासाठी रामबाण, रोज 6 बदाम खाल्ल्याने होतात हे फायदे

 हे जे गुगलने नवीन फीचर आणले आहे त्याला अमेरिकेच्या फुड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता गुगल हे त्याच्या स्मार्ट उपकरणांच्या माध्यमातून डॉक्टर गूगल होण्याच्या मार्गावर आहे.

तसे पाहायला गेले तर गुगलने वेगळ्या प्रकारचे फीचर्स त्यांच्या स्मार्ट उपकरणांमध्ये अगोदर आलेले आहेत जसे की, गुगलच्या पिक्सेल फोन मध्ये रक्ताचा रंग पाहून शरीरात ऑक्सिजन पातळी सांगणारे फिचर उपलब्ध आहे.

याशिवाय गुगलने आपल्या स्पीकर मध्ये देखील एक फीचर आणले असून याद्वारे रात्री तुमच्या घोरण्याचा आवाज ऐकून तुमची झोप कशी होते हे सांगते.

गुगल एका ब्रिटिश स्टार्टअप सोबत मिळून वैद्यकीय क्षेत्रात विविध आजारांचा शोध व त्यावर लवकर उपाय शोधण्याच्या कामात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स चा वापर करत आहे.

नक्की वाचा:अर्धांगवायूमध्ये( पक्षाघात) 'या' घरगुती उपाय केल्याने मिळतो बऱ्यापैकी आराम, जाणून घेऊ सविस्तर माहिती

यासोबतच गूगल ॲब व्ही नावाच्या एका मोठ्या औषध कंपनीसोबत अडीच अब्ज डॉलर पेक्षा जास्त रकमेचे एका प्रकल्पावर काम करत आहे.

एवढ्यावरच गुगल थांबणार असून येणाऱ्या काळात गुगल युजर्सचा इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड ठेवण्याचा देखील प्रयत्न करत आहे.

या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर गुगल भविष्यकाळात वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक मोठी क्रांती घडवण्यासाठी सज्ज होत आहे. गुगल वैद्यकीय क्षेत्रात वर्चस्व निर्माण करत असून गुगलने एकाच वर्षात 13 हजार कोटी रुपये या क्षेत्रात गुंतवणूक केली आहे.

नक्की वाचा:सावधान! त्वचेवर लाल चट्टे आणि खाज येते का?तर ताबडतोब बंद करा 'या' पदार्थांचे सेवन, वाचा सविस्तर

English Summary: google smartwatch give alert you to heart attack and stroke
Published on: 07 July 2022, 12:26 IST