मानवी शरीरात जवळपास 70 टक्के पाणी असते (The human body is about 70 percent water), आणि म्हणुन पाणी हे आपल्या शरीरासाठी खूपच आवश्यक असते. आपण जेवण न करता अनेक दिवस जिवंत राहू शकतो मात्र विना पाण्याचे एक दिवस देखील जगणे कठीण होऊन जाईल. मानवी शरीराच्या क्रिया सुरळीत पणे चालू राहण्यासाठी पाणीचे अनन्यसाधारण महत्त्व असते. आणि अशातच जर आपण आपल्या दिवसाची सुरुवात एक ग्लास कोमट पाणी पिऊन केली तर आपले आयुष्य बदलून जाईल. कोमट पाणी पिल्याने आपल्या शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे होतात (Drinking lukewarm water has many amazing benefits for your body). त्यामुळे आपल्या शरीरातील नैसर्गिक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडतात. भारतातील अनेक लोक सकाळी सकाळी आपल्या दिवसाची सुरुवात चहा अथवा कॉफी पिऊन करत असतात पण असे केल्याने आपल्या शरीराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते यामुळे नानाविध विकार आपल्या शरीराला जडतात चहा किंवा कॉफी पिणे ऐवजी आपण जर सकाळी सकाळी एक ग्लास कोमट पाणी सेवन केले तर त्यामुळे आपल्या शरीराला अनेक आश्चर्यकारक लाभ प्राप्त होऊ शकतात. आज आपण सकाळी सकाळी एक ग्लास कोमट पाणी पिल्याने नेमके कोणते कोणते फायदे आपल्या शरीराला होऊ शकतात याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. आणि आम्हाला आशा आहे की सकाळी सकाळी एक ग्लास कोमट पाणी पिल्याने होणारे फायदे जाणून आपण देखील आपल्या दिवसाची सुरुवात कोमट पाणी पिऊनच करणार चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
आहार तज्ञांच्या मते (According to dieticians), कोमट पाणी पिल्याने आपल्या शरीरातून बॅड टॉक्सिन्स बाहेर पडतात, त्यामुळे आपली त्वचामुलायम आणि चमकदार बनते. सकाळी सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिल्याने अथवा रात्री झोपण्याच्या वेळी कोमट पाणी पिल्याने मानवी शरीराचे पाचनतंत्र सुरळीत होते (The digestive system is smooth) त्यामुळे पोटासंबंधित अनेक विकार दूर होण्यास मदत होते. तसेच ज्या व्यक्तींना लठ्ठपणाचा त्रास असेल अथवा लठ्ठ व्यक्तींनी कोमट पाणी सेवन करण्याचा सल्ला दिला जातो (Obese people are advised to consume lukewarm water) कारण की कोमट पाणी सेवन केल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
कोमट पाणी पिल्याने होणारे आश्चर्यकारक फायदे (The amazing benefits of drinking lukewarm water)
मानवाचे पाचन तंत्र सुधारते (Improves human digestive system)
मित्रांनो सकाळी सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाणी पिल्याने मानवाचे पाचन तंत्र सुधारते, कोमट पाण्याचे नियमित सेवन केल्याने पोटात संबंधित अनेक विकार दूर केले जाऊ शकतात. त्यामुळे अनेक आहार तज्ञ कोमट पाणी पिण्याचा सल्ला देतात. थंड पाणी पिण्यापेक्षा कोमट पाणी पिल्याने आपल्या शरीराला अनेक लाभ होतात त्यामुळे थंड पाणी पिणे टाळावे आणि कोमट पाणी सेवन करावे.
रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यास मदत करते (Helps to boost the immune system)
जेव्हापासून कोरोना नामक व्हायरस या जगात आपले पाय पसरू लागला आहे तेव्हापासून प्रत्येक व्यक्ती रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी नानाविध उपाय करत असतो. आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता जर चांगली असेल तर नानाविध विकारापासून आपण वाचू शकतो. त्यामुळे जर आपणासही आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवायची असेल तर आपण सकाळी सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाण्याचे सेवन जरूर केले पाहिजे यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमालीची वाढते.
वजन नियंत्रित करण्यास मदत करते (Helps to control weight)
आहार तज्ञांच्या मते लक्ष व्यक्तींनी सकाळी सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्याचे सेवन जरूर केले पाहिजे यामुळे अशा व्यक्तींचे वजन कमी होते. तसेच ज्या व्यक्तींना लठ्ठपणाची समस्या नसेल त्यांनी देखील सकाळी सकाळी कोमट पाणी जरूर केले पाहिजे यामुळे त्यांचे देखील वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
Disclaimer- सदर आर्टिकल मध्ये सांगितलेली माहिती, केवळ सामान्य माहिती प्रदान करते. आम्ही सांगितलेली माहिती कोणताही वैद्यकीय सल्ला नाही. आपण कुठल्याही औषध अथवा पदार्थाचे सेवन करण्याआधी नेहमी एखाद्या विशेषज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Krishi Jagran Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही.
Published on: 06 January 2022, 09:34 IST