दररोजच्या आहारातून जे वेगवेगळे अन्नघटक आपल्या पोटात जातात त्याद्वारे आपल्या शरीराचं पोषण होत असतं. शरीराचं पोषण करणाऱ्या या महत्त्वाच्या घटकांची माहिती आपल्याला असायला हवी. मुख्यत्वे आपल्या जेवणात चपाती, पुरी, पराठा किंवा नान यांचा समावेश असतो. पण त्यापेक्षाही जास्त सकस आणि पोषक असलेल्या ज्वारीचा मात्र आहार म्हणून फार कमी वापर केला जातो. डायट प्लॅनमध्ये तर ती नावालासुद्धा नसते. म्हणूनच शहरी भागात ज्वारीची मागणी कमी झाली आहे. पण ग्रामीण भागात राहणारे लोकं आजही मुख्य अन्न म्हणून ज्वारीलाच प्राधान्य देतात.
ज्वारीमध्ये मुबलक प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात. त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. ज्यांना एसिडिटीचा त्रास आहे त्यांनी आहारात ज्वारीचा समावेश करावा. ज्वारीच्या सेवनामुळे मुळव्याधीचा त्रास होत नाही.
किडनीस्टोनचा त्रास असलेल्या व्यक्तीने आहारात ज्वारीचा समावेश केल्यास, पोषक तत्त्वांमुळे हा त्रास कमी होण्यास मदत होते. ज्वारीची भाकरीच नव्हे तर ज्वारीच्या इतर पदार्थांचाही आहारात समावेश करावा.
ज्वारीमध्ये लोह तत्त्वसुद्धा मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे एनिमियाचा त्रास असलेल्या व्यक्तीने आहारात ज्वारीच्या भाकरीचा समावेश केल्यास त्यांना फायदा होतो.
फास्ट फूड आणि जंक फूड खाण्यामुळे लठ्ठपणाचं प्रमाण वाढलं आहे. लठ्ठपणामुळे अनेक आजार उद्भवतात. आहारात ज्वारीच्या भाकरीचा समावेश केल्यास अतिरिक्त चरबी कमी होते आणि लठ्ठपणा कमी होतो.
शेतकऱ्यांनो कोरडवाहू शेतीतील खर्च करा कमी, तुमचं बजेट करा तयार..
मिनरल्स, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम हे प्रमुख तीन घटक ज्वारीमध्ये असल्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयासंबंधिचे आजार नियंत्रित राहतात.
ज्वारीमुळे रक्तवाहिन्यांमधील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं. ह्रदयरोग होण्यापासून वाचायचं असेल तर ज्वारीची भाकरी तुम्ही खायलाच हवी.
ज्वारीच्या सेवनामुळे मासिक पाळी आणि गर्भाशयाच्या समस्या उद्भवत नाहीत. त्यामुळे अशा समस्या दूर करण्यासाठा तुम्हाला आहारात ज्वारीचा समावेश करायलाच हवा.
शरीरातलं इन्शुलिनचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी ज्वारी अत्यंत गुणकारी ठरते. त्यामुळे मधुमेहींनी आहारात ज्वारीच्या भाकरीचा समावेश करावा.
आपल्या देशात ज्वारीचं पीक अमाप येतं आणि त्यातलं ५० टक्के उत्पादन महाराष्ट्रात होतं. आजही खेडोपाड्यात ज्वारीची भाकरी हेच लोकांचं प्रमुख अन्न आहे. जगभरातल्या प्रमुख धान्यांमध्ये गहू, तांदूळ, मका आणि बाजरीनंतर ज्वारीचा पाचवा नंबर लागतो.
धेनू ॲपच्या तंत्रामुळे फक्त एका तासातच विकली गाय, खरेदी विक्री झाली खूपच सोपी
आरोग्याच्या दृष्टीकोनातून पाहिलं तर गहू आणि इतर धान्यापेक्षा ज्वारी ही पचायला हलकी आणि आरोग्यासाठी अतिशय गुणकारी ठरते. त्यामुळे आठवड्यातले दोन दिवस तरी आहारात ज्वारीच्या भाकरीचा समावेश करावा.
रजोनिवृत्तीच्या काळात शरीरात हार्मोन्सचं प्रमाण कमी-जास्त होतं, अशा वेळेस महिलांनी आहारात ज्वारीचा समावेश करावा. आहारात ज्वारीचे पदार्थ असतील तर स्तनाचा कर्करोग होत नाही, असं संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून सिद्ध झालं आहे. उत्तम गुणधर्मामुळे ज्वारी आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर ठरते.
महत्वाच्या बातम्या;
100 म्हशी आणि 100 एकर जमीन! रामेश्वर मांडगेंनी करून दाखवलं
राज्यात गारपीटीची शक्यता, शेतकरी चिंतेत, काळजी घेण्याचे आवाहन
उत्पादक उपाशी, व्यापारी तुपाशी, कांद्याचा झालाय वांदा...
Published on: 06 March 2023, 12:14 IST