पुणे: जगभरासह भारतातही मंकीपॉक्स विषाणूचा (Monkeypox) प्रार्दुभाव खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भारतात आतापर्यंत मंकीपॉक्सचे आठ रुग्ण आढळले आहेत. देशातील मंकीपॉक्स विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सीरम इंस्टिट्यूटने मोठा निर्णय घेतला आहे.
मंकीपॉक्स विषाणूवर लवकरच येणार लस
देशात मंकीपॉक्सचे रुग्ण वाढत आहे. मंकीपॉक्स विषाणूवर लस शोधण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे (Serum Institute of India) सीईओ (CEO) अदर पुनावाला (Adar Poonawala) यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री (Health Minister) यांची बैठक पार पडली.
सीरम इन्स्टिट्यूटचे (SII) सीईओ अदार पूनावाला यांनी सांगितलं आहे की, 'लवकरच मंकीपॉक्स लस उपलब्ध होईल. त्यावर संशोधन सुरु आहे. गेल्या काही महिन्यांपासून मंकीपॉक्सचा विषाणू जगातील अनेक देशांमध्ये वेगाने पसरत आहे.
Monkeypox: 'या' देशात मंकीपॉक्सचा दुसरा बळी; जगभरात आढळले 20 हजारांहून रुग्ण
आता भारतातही मंकीपॉक्स विषाणूची अनेक प्रकरणं समोर आली आहेत, अद्याप अनेक रुग्णांचा अहवाल येणं बाकी आहे. सीरमकडून लस तयार करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. काही महिन्यांत लस उपलब्ध होईल.'
हे ही वाचा: भारीच की! पूरग्रस्त भागातही करता येणार शेती, या खास तंत्राचा वापर करा आणि मिळवा चांगले उत्पादन
देशात मंकीपॉक्सचा वाढता संसर्ग पाहता या परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. याआधीच जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) मंकीपॉक्स विषाणूला जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर करत चिंता व्यक्त केली आहे.
हे ही वाचा: शेतकऱ्यांनो केळीची देठं तुम्हाला बनवतील करोडपती! जाणून घ्या मालामाल करणाऱ्या व्यवसायाबद्दल
Published on: 03 August 2022, 10:19 IST