पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 15 जुलै पासून पुढील पंचात्तर दिवस 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस मोफत मिळणार आहे. 27 सप्टेंबर पर्यंत हा मोफत बूस्टर डोस दिला जाऊ शकतो.
राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये हा बूस्टर डोस उपलब्ध असणार असून संपूर्ण देशात 199 कोटी लसीचा डोस लागू करण्यात आलेले आहेत.
सरकारने मागील काही दिवसांपूर्वी बूस्टर डोस देण्याचा कालावधी कमी केला असून अगोदर दोन डोस घेतल्यानंतर नऊ महिन्यानंतरच एखाद्याला बूस्टर डोस मिळत असे. परंतु आता त्याचा कालावधी सहा महिन्यांवर आणला गेला आहे.
नक्की वाचा:Corona Update: चिंता वाढली: कोरोना रुग्ण संख्या कमी, मात्र मृत्यू संख्या वाढली
प्रिकॉशन डोस वाढवेल शरीराची रोगप्रतिकारक शक्ती
आयसीएमआर सह अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, कोरोना लसीचे दोन डोस दिल्यानंतर शरीरातील अँटीबॉडीज ची पातळी सुमारे सहा महिन्यांनी कमी होते.
परंतु ज्यावेळी बूस्टर डोस दिला जातो तेव्हा रोगप्रतिकारक प्रतिक्रिया वाढते. यासाठी सरकार आता 75 दिवसांसाठी विशेष मोहीम सुरू करणार आहे.
नक्की वाचा:मोठी बातमी: सरकारकडून खाद्यतेलाचे दर कमी करण्याचे निर्देश; सर्वसामान्यांना दिलासा..
गेल्या आठवड्यात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लसीचा दुसरा आणि प्रिकॉशन डोस नऊ महिन्यांनी वरून सहा महिन्यांपर्यंत कमी केला होता.
हर घर दस्तक अभियान 2.0 एक जून रोजी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये या लसीकरणाला गती देण्यासाठी आणि बूस्टर डोस ला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आले. दोन महिन्यांच्या कालावधीकरिता हा उपक्रम आता सुरू आहे.
नक्की वाचा:'स्वाभिमानी मिळवून देणार शेतकऱ्यांना ५० हजार, पूर असेल तर पोहत येऊन मोर्चात सहभागी व्हा'
Published on: 13 July 2022, 09:20 IST