Health

आपल्यापैकी बरेचजण नदि,तलावांमध्ये अंघोळ केलेली आहे. आपल्याला माहित आहे कि जेव्हा आपण नदी किंवातलावातील पाण्यात उतरतो तेव्हा सर्वप्रथम आपण आपले पाय पाण्यामध्ये टाकतो.

Updated on 07 May, 2022 10:34 PM IST

 आपल्यापैकी बरेचजण नदि,तलावांमध्ये अंघोळ केलेली आहे.  आपल्याला माहित आहे कि  जेव्हा आपण नदी किंवातलावातील पाण्यात उतरतो तेव्हा सर्वप्रथम आपण आपले पाय पाण्यामध्ये टाकतो.

त्यानंतर आपल्याला जाणीव होते की पाणी किती थंड आहे ते किंवा पाण्याचे तापमान किती आहे हे देखील आपल्याला समजते. त्यानंतर आपण हळूहळू पाण्यामध्ये सहजरित्या जातो आणि त्यानंतर जेव्हा पाणी आपल्या मानेपर्यंत पोहोचते तेव्हा आपल्या शरीराचे तापमान पाण्याच्या तापमानाबरोबर ऍडजेस्ट होऊन जाते. त्यानंतर आपण सहजरीत्या पाण्यामध्ये  मनसोक्त पोहतो. या पद्धतीत आंघोळीची प्रक्रिया सर्वप्रथम आपल्या पाया पासून सुरू होऊन डोक्यापर्यंत जाऊन संपते. क्लिनिकल रिसर्च इंटिग्रेटेड  ॲलोपॅथी अँड आयुर्वेद, रांची  येथील चिकित्सक डॉ. सुरेश अग्रवाल म्हणतात की, आंघोळ करायला सुरुवात करतानापाण्याला सरळ डोक्यावर टाकणे योग्य नाही. आपल्या भारतामध्ये पूर्व कालापासून परंपरा आहे की, अगोदर पाय, कंबर, मान आणि सगळ्यात शेवटी डोक्यावर पाणी टाकले जाते.

 जर वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर डोक्यावर थंड पाणी टाकल्यानंतर रक्ताभिसरण क्रिया डिस्टर्ब होते. केपलेरी व्हेन्स अंकुचन पावतात व त्यामुळे रक्तदाब अचानक वाढतो. तसे पाहायला गेले तर अशा परिस्थितीत पायांपासून पूर्ण शरीरातील रक्त डोक्याकडे जाते. त्यामुळे रक्तपुरवठा कमी झाल्याने स्ट्रोक चा धोका वाढतो. डॉ. अग्रवाल म्हणतात की, बरेसचे ब्रेन स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक च्या घटना ह्या बाथरुम मध्ये अंघोळ करताना जास्त प्रमाणात होतात.

 अगोदरच काही आजाराची पार्श्वभूमी असेल तर धोका अधिक असतो

 त्यामुळे सामान्यपणे आंघोळ करताना या पद्धतीचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे. परंतु काहींना जर हृदयाशी संबंधित काही त्रास असेल तर  अशा लोकांना लवकर त्रास होऊ शकतो. आतापर्यंत अभ्यासात दिसून आले आहे की अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये अगोदरपासून रुग्णांना अशा प्रकारची लक्षणे असतात.

 पुन्हा पुन्हा आंघोळ करणे योग्य का नाही?

 उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घाम येणे ही एक नैसर्गिक क्रिया  आहे. बऱ्याच लोकांना खूप जास्त प्रमाणात घाम येतो. अशावेळी बाहेरच्या वातावरणातून फिरून आल्यानंतर लगेच आंघोळ करणे आरोग्यासाठी ठीक नाही. याबाबतीत डॉक्टरांचे म्हणणे आहे की, दिवसांमध्ये एकापेक्षा जास्त वेळा अंघोळ केल्याने स्कीनमधील ऑइल निघून जाते. त्यासोबत आरोग्यासाठी उपयुक्त बॅक्टेरिया देखील बाहेर निघून जातात जे आपल्या त्वचेचे इन्फेक्शन पासून बचाव करतात. त्यामुळे त्वचा कोरडी होते व पडलेल्या भेगांमधून घातक बॅक्टेरिया आत मध्ये प्रवेश करतात.

 

( टीप- वरील माहिती विविध स्त्रोतांकडून घेतली असून वाचकांसाठी माहितीस्तव सादर केली आहे. या माहितीशी व्यक्तिगत किंवा कृषी जागरण समूह सहमत असेलच असे नाही)

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:तरुण शेतकरी मित्रांनो! शेती तर नक्कीच करा परंतु शेतीला जोडधंदा म्हणून बटाटा प्रक्रिया उद्योगाचा विचार करा

नक्की वाचा:नक्की वाचा! निसर्ग ठरवतो कोणत्या घटकाला लवकर कुजवायचे, कुजवणे हे निसर्गाची क्रिया आहे आपली नाही....!

नक्की वाचा:Poultry Farming : उन्हाळ्यात 'या' पद्धतीने करा कोंबडीचे संगोपन; होणार फायदा

English Summary: can give more health benifit to such habbit to bath that avoid strok and high blood pressure
Published on: 07 May 2022, 10:34 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)