Health

सध्याच्या जीवनशैलीमुळे लोकांच्या छोटमोठ्या आजारांवर परिणाम होत असतो. भारतात डायबीटीजचा समावेश सामान्य आजारांमध्ये झालेला पाहायला मिळत आहे. सुस्त लाईफस्टाइल, चुकीच खाणं पिणं काही चुकीच्या सवयी यामुळे डायबीटीज (diabetes) रुग्णांची संख्या वाढत असते.

Updated on 16 September, 2022 11:27 AM IST

सध्याच्या जीवनशैलीमुळे लोकांच्या छोटमोठ्या आजारांवर परिणाम होत असतो. भारतात डायबीटीजचा समावेश सामान्य आजारांमध्ये झालेला पाहायला मिळत आहे. सुस्त लाईफस्टाइल, चुकीच खाणं पिणं काही चुकीच्या सवयी यामुळे डायबीटीज (diabetes) रुग्णांची संख्या वाढत असते.

सुस्त लाइफस्टाईल

आराम करायला तर सर्वांनाच आवडतं. सगळ्यांना सोफ्यावर किंवा बेडवर लेटून टीव्ही बघावी वाटते किंवा वेबसीरीज (webseries) बघाव्या वाटतात. पण हा असा जास्त वेळ केलेला आराम तुमच्यासाठी फार नुकसानकारक आहे.

जास्त वेळ बसून राहिल्याने किंवा लेटल्याने, कोणतीही शारीरिक हालचाल न केल्याने, फुप्फुसांवर वाईट प्रभाव पडतो. रिसर्चमधून समोर आलं आहे की, टाइप 2 डायबिटीसचा धोका अशा लोकांना जास्त असतो जे लोक दिवसभर बसून राहतात किंवा लेटून राहतात.

कांदा उत्पादक शेतकरी संकटात; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला 'हा' निर्णय

मद्यसेवन आणि धुम्रपान

जास्त धुम्रपान आणि मद्यसेवनाचा थेट संबंध हृदयरोग, हाय कोलेस्ट्रॉल, हाय ब्लड प्रेशर आणि डायबिटीसशी आहे. धुम्रपानाने ब्लड वेसल्सवर प्रभाव पडतो आणि धमण्या आकुंचन पावतात. ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका असतो. यामुळे डायबिटीसचा धोकाही वाढतो. जास्त मद्यसेवन केल्याने फॅटी लिव्हर ची समस्या सुरू होते, जी पुढे जाऊन डायबिटीसचं कारण ठरते.

पोषणाची कमतरता

आवश्यक मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रिएट्सच्या (Micro Nutrients) कमतरतेमुळे अनेक आजार होतात आणि याने पूर्ण आरोग्य बिघडतं. माहितीनुसार पालेभाज्या, वीगन आणि मेडीटेरियन डायट डायबिटीसचा धोका टाळू शकतात.

सोबत बऱ्याच काळापासून व्हिटॅमिन डी (Vitamin D) ची कमतरता असले तर डायबिटीसचा धोका वाढतो. प्रोटीन, फायबर, आवश्यक फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्स असलेला आहार घेतला तर शरीरात ब्लड शुगर लेव्हल आणि इन्सुलिनचं प्रमाण कंट्रोलमध्ये राहतं.

शेतकऱ्यांसाठी किसान विकास पत्र योजना ठरतेय अत्यंत फायदेशीर; गुंतवणूकदारांचे पैसे होतात दुप्पट

लठ्ठपणा

व्यक्तीचं वजन वाढू लागले की याचा धोका आजारांवर होण्याची शक्यता असते. ज्यामुळे पुढे जाऊन त्यांना डायबिटीस होऊ शकतो. तसेच लोअर बॉडी इंडेक्स (Lower Body Index) असलेल्या लोकांनाही डायबिटीसचा धोका अधिक राहतो.

तणाव

माणसाचा तणाव शरीर आणि मेंदूच्या क्रियामध्ये गडबड करतो. ज्यामुळे लठ्ठपणा, इन्सुलिन रेजिस्टेंस आणि डायबिटीसचा धोका वाढतो. झोपेच्या कमतरतेमुळेही ही समस्या वाढू शकते. त्यामुळे एक्सरसाइज, मेडिटेशन आणि पौष्टिक आहार घेऊन तणाव दूर करावा.

महत्वाच्या बातम्या 
शेवग्याला मिळतोय तब्बल 16 हजार रुपयांचा भाव; जाणून घ्या इतर पालेभाज्यांचे बाजारभाव
'या' सरकारी योजनेतुन वृद्धांना दरमहा 9 हजार रुपयांपर्यंत मिळते पेन्शन; असा करा अर्ज
सावधान! आज आर्थिक स्थिती बिघडण्याची शक्यता; जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य

English Summary: Beware You can diabetes because Take care like
Published on: 16 September 2022, 11:23 IST