Health

वैज्ञानिकांचा दाव्यानुसार बीअर पिणं हे शरीरातल्या आतड्यांसाठी फायद्याचे आहे. अशी माहिती समोर आली आहे. बीअरमध्ये अनेक जुन्या आजारांना रोखण्याची क्षमता असते, असे समोर आले आहे. पोर्तुगालमधील 'सेंटर फॉर रिसर्च ईन टेकनॉलॉजिज अँड सर्व्हिसेस' (CINTESIS) यांनी संशोधन केले आहे. यामध्ये ही माहिती समोर आली आहे.

Updated on 07 July, 2022 5:10 PM IST

आपण बघतो की सध्या तरुणांचे व्यसनाचे प्रमाण खूपच वाढले आहे. यामुळे येणाऱ्या काळात हा आकडा अजूनच वाढणार आहे. तणावातून बाहेर पडण्यासाठी मद्यपाण करण्याचे प्रमाण जास्त आहे. मात्र सगळीकडे बोलले जाते की, मद्यपान करणं शरीराला हानिकारक आहे. यामुळे आपले खूप नुकसान होते. त्यामुळे आपल्यालाला हृदयविकाराचे झटके येतात, असे अनेकदा आपल्याला सांगितले जाते. मात्र तरी देखील याचे प्रमाण काही केल्यास कमी होत नाही.

अनेक आजार होण्यापेक्षा काहीजण यापासून लांब देखील राहतात. मात्र वैज्ञानिकांचा दाव्यानुसार बीअर पिणं हे शरीरातल्या आतड्यांसाठी फायद्याचे आहे. अशी माहिती समोर आली आहे. बीअरमध्ये अनेक जुन्या आजारांना रोखण्याची क्षमता असते, असे समोर आले आहे. पोर्तुगालमधील 'सेंटर फॉर रिसर्च ईन टेकनॉलॉजिज अँड सर्व्हिसेस' (CINTESIS) यांनी संशोधन केले आहे. यामध्ये ही माहिती समोर आली आहे.

त्यांनी याबाबत एक संशोधन केले आहे. त्यांनी संशोधनात 23 ते 58 वय वर्ष असणाऱ्या निरोगी पुरुषांचा समावेश करण्यात आला. या पुरुषांना रोज चार आठवडे त्यांनी 330 मिलीलीटर बीअर पिण्यास दिली. त्यांच्यावर बारकाईने लक्ष देण्यात आले तसेच त्यांना काही त्रास होतोय का? यावर देखील लक्ष ठेवण्यात आले.

२०२३ पर्यंत बटाटे आयात करण्यास परवानगी, दर कोसळण्याची शक्यता

फूड रिसर्च सेंटरने केलेल्या संशोधनातून असे समोर आले की, बीअर प्यायल्यामुळे आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियाची वाढ होते. तसेच वजन कमी होण्यास मदत करते. आपली पचनशक्ती देखील सुधारते, तसेच बीअरचे सेवन केल्यावर हृदय आणि मेटाबॉलिजम सारखे आजार होत नाहीत. मात्र या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या शरीरावर अवलंबून आहेत.

महत्वाच्या बातम्या;
७० एकर शेतीला लोकवर्गणीतून घातले कुंपण, शेतीच्या नुकसानाला बसणार आळा
आता सरपंच पुन्हा जनतेतून? नवीन सरकार निर्णय घेण्याची शक्यता
शेवटची संधी!! एवढ्या स्वस्तात मिळत आहे बार-सिमेंट-विटा, घर बांधताना पैशांची होणार बचत..

English Summary: beer going beneficial your body information research beneficial
Published on: 07 July 2022, 05:10 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)