Health

आपल्या आहाराचा आपल्या दैनंदिन आयुष्यावर आणि शरीरावर खूप महत्त्वाचा परिणाम होत असतो. आपण जेव्हा आहाराचा विचार करतो तेव्हा सकाळी हलका नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण असा एकंदरीत आपला एक दिनक्रम असतो. जर आपण यामधील नाश्त्यापासून विचार केला तर कुठल्याही वेळचा आहार हा आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा असतो.परंतु रात्रीच्या जेवणाचा विचार केला तर ते शरीरासाठी आणि आरोग्यासाठी तुलनेने खूप महत्त्वाचे असते.

Updated on 24 September, 2022 2:19 PM IST

आपल्या आहाराचा आपल्या दैनंदिन आयुष्यावर आणि शरीरावर खूप महत्त्वाचा परिणाम होत असतो. आपण जेव्हा आहाराचा विचार करतो तेव्हा सकाळी हलका नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण असा एकंदरीत आपला एक दिनक्रम असतो. जर आपण यामधील नाश्त्यापासून विचार केला तर कुठल्याही वेळचा आहार हा आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा असतो.परंतु रात्रीच्या जेवणाचा विचार केला तर ते शरीरासाठी आणि आरोग्यासाठी तुलनेने खूप महत्त्वाचे असते.

नक्की वाचा:Health Tips : सावधान! 'या' 10 पदार्थांचे सेवन आजच बंद करा, नाहीतर होणार कॅन्सर, संशोधनात झाल उघड

 परंतु आपण आहार घेताना काय खावे आणि काय खाऊ नये याचा विचार करणे देखील तेवढेच गरजेचे आहे. जर आपण रात्रीच्या जेवणाचा विचार केला तर ते हलके असले पाहिजे पण त्याचबरोबर आरोग्यदायी देखील असणे गरजेचे आहे.

परंतु अशा अन्नपदार्थांमध्ये काही अन्नपदार्थ असे आहेत की ते रात्रीच्या वेळी खाणे टाळले पाहिजे कारण ते आयुर्वेदाचा विचार केला तर त्यानुसार कप दोषांमध्ये असंतुलन निर्माण करतात. ते कोणते अन्नपदार्थ आहेत त्यासंबंधी आपण माहिती घेऊ.

 रात्रीच्या वेळी टाळावे 'या'अन्नपदार्थांचे सेवन

1- दही- आपल्याला साधारणपणे एक सवय असते की जेव्हा आपण रात्री जेवण करतो तेव्हा जेवण झाल्या नंतर थोडे दही खातो. परंतु यासंबंधी आयुर्वेदाचा विचार केला तर दही हे कफ आणि पित्त वाढवते म्हणजे त्याचे सेवन केल्याने खोकला,घसा खवखवणे तसेच इतर प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात.

2- गोड पदार्थ- बऱ्याच जणांना जेवण केल्यानंतर स्वीट खाण्याची आवड असते. परंतु असे गोड पदार्थ हे पचायला जड असतात म्हणजेच कठीण असतात आणि यामुळे तुम्हाला श्लेष्मा  तयार होण्याची शक्यता असते.

नक्की वाचा:Health Tips: सुदृढ आणि निरोगी शरीरासाठी 'असा'असावा आहार,आरोग्य राहिल ठणठणीत

3- मैदायुक्त पदार्थ- मैद्याला गोड विष म्हटले जाते कारण त्यामध्ये फायबर नसते आणि जास्त प्रमाणात जर मैदायुक्त पदार्थ सेवन केले तर मुळव्याध,बद्धकोष्टता अशा प्रकारच्या समस्या निर्माण होतात व रात्री मैद्यापासून बनवलेले पदार्थ खाल्ले तर ते पचायला देखील जड जातात.

4- गहू- आयुर्वेदानुसार विचार केला तर गहू हा पचायला खूप वेळ घेतो म्हणजेच भारी मानला जातो. त्यामुळे रात्रीच्या वेळी गहू व गव्हापासून बनवलेले पदार्थांचे सेवन केल्याने विपरीत परिणाम पचनसंस्थेवर होऊ शकतो.

( टीप- वरील माहिती विविध स्त्रोतांकडून घेतली असून ती वाचकांसाठी माहितीस्तव सादर केली आहे. या माहितीशी व्यक्तिगत आणि कृषी जागरण समूह सहमत असेलच असे नाही.  कुठलेही उपचार करण्याअगोदर किंवा आहारात बदल करणे अगोदर वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा)

नक्की वाचा:रात्री शांत झोप लागत नसेल तर एकदा 'हा' झोपेचा चहा प्या; मिळेल आरामदायक फायदा

English Summary: avoid this food in diet at night because they are harmful for body
Published on: 24 September 2022, 02:19 IST