Health

रोजच्या आहारात आपण किमान एका सफरचंदाचा समावेश केल्यास कधीही डॉक्टरकडे जावं लागणार नाही, असं म्हटलं जातं.

Updated on 25 April, 2022 3:57 PM IST

रोजच्या आहारात आपण किमान एका सफरचंदाचा समावेश केल्यास कधीही डॉक्टरकडे जावं लागणार नाही, असं म्हटलं जातं. याचा अर्थ असा की सफरचंद हे आपल्या आरोग्यासाठी इतके लाभदायक असते की रोज त्याचा आहारात समावेश केल्याने आपण अनेक आजारापासून आपण दूर राहतो, आणि त्यामुळे दवाखान्याची पायरी चढायची वेळच येत नाही.

सफरचंद हे एक असं फळ आहे, ज्याच्या सेवनानं शरीरास पोषक असलेली सर्वच तत्त्वं शरीरास मिळतात, डॉक्टर तसेच आहारतज्ज्ञांकडून निरोगी आरोग्यासाठी दररोज आहारात एका सफरचंदाचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे कित्येक गंभीर आजारांपासून बचाव होण्यास सफरचंदाची मदत होते.

सफरचंदाच्या सेवनामुळे अल्झायमर, कर्करोग, मधुमेह, ट्युमरसारख्या व हृदयाशी संबंधित आजारांचा आजारांचा धोका कमी होत असल्याचे डॉक्टर सल्ला देतात. या फळात असणाऱ्या फायबरमुळे आपलं पोट स्वच्छ राहण्यास मदत होते. शिवाय, हृदय आणि स्नायूंच्या समस्यांपासून तुमची सुटका मिळते.

सफरचंद सेवनामुळे आपण वजन कमी करण्यास मदत होते, सफरचंदामध्ये पॉलीफेनॉल, आहारातील फायबर, कॅरोटीनोइड जे एक प्रकारचे अँटी-ऑक्सिडेंट आणि बरेच पौष्टिक पदार्थ आढळतात. ज्याद्वारे लठ्ठपणा नियंत्रित केला जाऊ शकतो.

दररोज सफरचंदाचे सेवन केल्यास रोगप्रतिकार शक्ती मजबूत केली जाऊ शकते. सफरचंदांमध्ये अँटीऑक्सिडेंट्स आणि फायटोकेमिकल्स असतात त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास सफरचंद गुणकारी मानले जाते.

महत्वाच्या बातम्या
Custerd Apple Variety : भारतातील सर्वात जास्त उत्पादन देणाऱ्या सीताफळच्या जाती ; वाचा याविषयी
माळवाडीच्या शेतकऱ्याची परदेशी पाहुण्याला भुरळ, शेती बघण्यासाठी परदेशी पाहुणे माळवाडीच्या शिवारात

English Summary: Apples are beneficial for health, 'these' are the benefits
Published on: 25 April 2022, 03:57 IST