Health

नागरिकांनी आणि सर्वसामान्य लोकांनी कोणतीही गोष्ट खरेदी करीत असताना काळजी घेण्याची गरज आहे. अन्न आणि औषधी प्रशासनाने मुंबईतील चिंचबंदर परिसरातून 400 किलो भेसळयुक्त तूप जप्त केले आहे. या तुपाचे नमूने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

Updated on 20 October, 2022 10:55 AM IST

नागरिकांनी आणि सर्वसामान्य लोकांनी कोणतीही गोष्ट खरेदी करीत असताना काळजी घेण्याची गरज आहे. अन्न आणि औषधी प्रशासनाने मुंबईतील चिंचबंदर परिसरातून 400 किलो भेसळयुक्त तूप (adulterated ghee) जप्त केले आहे. या तुपाचे नमूने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

मात्र तपासणीचा अहवाल आल्यानंतर यावर करण्यात येणार आहे, असे देखील अन्न प्रशासन विभागाने सांगितले आहे. उत्सव काळामध्ये बाजारात भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री होत असल्याचे अन्न आणि औषधी विभागाच्या कारवाईतून उघड करण्यात आले आहे.

शेतकऱ्याची कमाल! बिबीएफ तंत्राद्वारे घेतोय लाखों रुपयांमध्ये उत्पन्न; जाणून घ्या पद्धती

अन्न आणि औषधी विभागाला मिळालेल्या माहितीनंतर अधिकाऱ्यांनी मंगळवार, १८ ऑक्टोबर रोजी चिंचबंदर येथील श्रीनाथजी इमारतीतील मेसर्स ऋषभ शुद्ध घी भंडारवर छापा टाकला. यावेळी अन्न सुरक्षा मानके कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले.

शेतकऱ्यांनो जनावरांना योग्य आहार देऊन वाढवा रोगप्रतिकारक्षमता; होईल चांगला फायदा

तसेच तुपाचा दर्जा संशय होता. त्यामुळे ४०० किलो तुपाचा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती सहआयुक्त अन्न, एफडीए, शशिकांत केकरे यांनी दिली. जप्त करण्यात आलेल्या साठ्याची किंमत दोन लाख ९९ हजार ९० रुपये इतकी आहे.

तुपाचे तीन नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यासंबंधीचा अहवाल सादर झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 
दिलासादायक! सांगली जिल्ह्यातील 61 हजार शेतकऱ्यांना उद्या मिळणार प्रोत्साहन अनुदान
रब्बी हंगामासाठी नवीन ज्वारीचे वाण विकसित; शेतकऱ्यांना होणार दुहेरी फायदा
एलआयसीची नवीन पॉलिसी लाँच; 15 वर्षांनंतर तब्बल 22 लाखांचा लाइफ कव्हर मिळणार

English Summary: adulterated ghee seized Mumbai Information provided Food Drug Department
Published on: 20 October 2022, 10:48 IST