Government Schemes

भारताच्या अर्थमंत्री निर्मला सितारमण या बारामती लोकसभेच्या प्रवास दौऱ्यावर आल्या आहेत. त्यांनी वरवे भोर येथे लाभार्थी संवाद या कार्यक्रमात केंद्रीय कृषी मंत्रालय दिल्ली यांचे कडून दौंड तालुक्यातील "रमाई स्वयंसहायता महिला समूह बचत गटाला" मिळालेल्या ट्रॅक्टरचे पूजन केले. यावेळी त्यांनी या महिलांशी संवाद साधला.

Updated on 23 September, 2022 1:14 PM IST

भारताच्या अर्थमंत्री निर्मला सितारमण या बारामती लोकसभेच्या प्रवास दौऱ्यावर आल्या आहेत. त्यांनी वरवे भोर येथे लाभार्थी संवाद या कार्यक्रमात केंद्रीय कृषी मंत्रालय दिल्ली यांचे कडून दौंड तालुक्यातील "रमाई स्वयंसहायता महिला समूह बचत गटाला" मिळालेल्या ट्रॅक्टरचे पूजन केले. यावेळी त्यांनी या महिलांशी संवाद साधला.

केंद्राकडून शेतकऱ्यांना अनेक योजना सुरु केल्या आहेत. याबाबत माहिती देखील दिली. अर्थमंत्री निर्मला सितारमण या बारामती लोकसभेच्या प्रवास दौऱ्यावर आल्या आहेत. या दौऱ्यात त्या अनेक ठिकाणी भेटी देत असून बारामती लोकसभा मतदार संघ काहीही करून जिंकायचा अशा तयारीनिशी भाजप आता मैदानात उतणार आहे.

सितारमण यांनी संवाद या कार्यक्रमात केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून ट्रॅक्टर मिळाला म्हणुन दौंड तालुक्यातील रमाई महिला बचत गट सभासदांनी मिळालेल्या लाभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करणारे पत्र निर्मलाजींना सुपूर्द केले. यावेळी बचत गटातील महिलांनी दिलेले पत्र मोदीजींना पोहोचविण्याचे आश्वासन निर्मलाजींनी दिले.

नोकरीला काय करता, डाळिंबाची लागवड करून अवघ्या सातशे झाडांपासून कमावले १८ लाख रुपये

याप्रसंगी महिलांनी बचत गटातील कामाची माहिती सांगितली व इतर उपस्थित लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच दौंड तालुक्यातील "वासुदेव नाना काळे शेतकरी बचत गटाला" मिळालेल्या कुलींग व्हॅनचे निर्मलाजींच्या हस्ते लोकार्पण झाले. या बचत गटातील शेतकऱ्यांशी देखील त्यांनी संवाद साधला. तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

शेतकऱ्यांनो घोणस अळीचा विषारी दंश झाला तर लगेच करा 'हे' उपाय

भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी याबाबत अनेक शेतकऱ्यांना केंद्राच्या योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. याचा शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होत आहे. यावेळी माजी मंत्री राम शिंदे, हर्षवर्धन पाटील तसेच मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या;
Cotton Rate: शेतकऱ्यांना दिलासा! यंदा देखील कापूस तेजीतच राहणार, मिळणार 'इतका' भाव
दुधाचे दर पुन्हा वाढणार, मदर डेअरी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्याची शक्यता
माळेगावला गावे जोडण्यास सभासदांचा विरोध, शेतकरी न्यायालयात जाणार

English Summary: Tractors, cooling vans, released Finance Minister from Ministry Agriculture farmers
Published on: 23 September 2022, 01:14 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)