भारत हा कृषिप्रधान देश असून भारतातील बहुसंख्य शेतकरी शेती सोबत विविध प्रकारचे जोडधंदे करतात. या जोडधंदा यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पन्नाचे एक चांगला स्त्रोत निर्माण होतो. या जोडधंदा पैकी पशुपालन, कुक्कुटपालन, शेळीपालन इत्यादी व्यवसाय मोठ्या प्रमाणात केली जातात.
या व्यवसायांपैकी जर आपण शेळीपालन व्यवसाय याचा विचार केला तर, हा व्यवसाय अगदी कमीत कमी जागेत आणि कमीत कमी खर्चात चांगला उत्पन्न देणारा व्यवसाय आहे.
बहुसंख्य सुशिक्षित बेरोजगार तरुण मोठ्या प्रमाणात शेळीपालन व्यवसाय कडे वळत आहेत. तसेच या व्यवसायाला शासकीय योजनांचा देखील पाठबळ मिळत असून मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय भरारी घेत आहे.
अशीच एक शासकीय योजना आहे जी शेळीपालन व्यवसायात खूप मदत करण्यासाठी सज्ज आहे. या लेखात आपण या योजनेविषयी माहिती घेऊ.
शेळी समूह योजनेचे स्वरूप
आपण या योजनेचा विचार केला तर राज्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या माध्यमातून शेळी आणि मेंढी यांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात.
हे महामंडळ आणि गोट बँक ऑफ कारखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांना शेळ्या वाटप करण्यात आले आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर पाचशे शेळ्यांचे वाटप करण्यात येऊन सध्या हा प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आला असून येणाऱ्या काळात संपूर्ण राज्यात राबविला जाणार आहे.
या महामंडळाचे प्रक्षेत्र आहे त्यावर बळकटीकरण, आधुनिकीकरण करण्यासाठी जवळजवळ 94 कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. या निधीच्या माध्यमातून आधुनिक यंत्रसामग्री देखील घेतली जाणार आहे.
या योजनेचा उद्देश्य
1- क्लस्टर अर्थात समूह विकासा मधून शेळीपालन व्यवसायास गती देणे.
2- या योजनेच्या माध्यमातून शेळीपालना व्यवसायात नवीन उद्योजक निर्माण करणे.
3- जे शेळी पालक आहेत त्यांचे संस्था, फेडरेशन तसेच उत्पादक कंपनी स्थापन करून या संस्थांच्या माध्यमातून संबंधित शेळी पालकांना शेळीपालना विषयी अत्याधुनिक प्रशिक्षण, सुविधा तसेच तांत्रिक माहिती, अद्ययावत तंत्रज्ञान, आरोग्य सुविधा इत्यादी गोष्टी साधल्या जाणार आहेत.
4- तसेच बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
5- तसेच शेळी पालना करता लागणाऱ्या आवश्यक गोष्टी उपलब्ध करून देणे व शाळेच्या पैदास कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी हा महत्त्वाचा हेतू आहे.
नक्की वाचा:Goat Care: शेळीपालनात आहात तर पावसाळ्याआधी शेळ्यांना दया 'या' लसी,आजार राहतील दूर
या पाच विभागात ही योजना लागू
1- दापचरी( पालघर )- कार्यक्षेत्र मुंबई शहर, मुंबई उपनगरे, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग
2- बिलाखेड( चाळीसगाव )- कार्यक्षेत्र- जळगाव, अहमदनगर, धुळे, नासिक
3- बोंद्री( रामटेक, नागपूर)- कार्यक्षेत्र- नागपूर, गोंदिया, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर
4- तीर्थ( तुळजापूर, उस्मानाबाद)- कार्यक्षेत्र- परभणी, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, हिंगोली, औरंगाबाद आणि जालना
5- रांजणी( कवठेमहांकाळ, सांगली)- कार्यक्षेत्र- सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे
या योजनेच्या माध्यमातून शेळी पालन व्यवसाय विषयी सखोल ज्ञान शेळी पालकांना व्हावे याकरता स्टेट ऑफ द आर्ट ही संकल्पना विचारात घेऊन शेळी समूह प्रकल्पांतर्गत दोन एकर क्षेत्रावर सामूहिक सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे.
तसेच अडीच एकर क्षेत्रावर शेळ्यांचे दूध व दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया केंद्राचे दोन युनिट स्थापन करण्यात येणार आहेत. सुमारे दीड एकर क्षेत्रावर मांस प्रक्रिया केंद्र एक युनिट स्थापन करण्यात यावा
यासाठी लागणारे सर्व सुविधा उभारण्यासाठी लागणारे यंत्र सामग्री, बांधकाम इत्यादीसाठी प्रक्षेत्रावरील जमीन खाजगी व्यक्ती अथवा संस्थेस भाडे तत्त्वावर देण्यात येणार असून त्या व्यक्तीला ही भाडेकरारावर जमीन देण्यात येईल ती संबंधित व्यक्ती किंवा संस्था सदर केंद्राची उभारणी करणार.
Published on: 05 July 2022, 09:06 IST