जीवनामध्ये दैनंदिन कौटुंबिक गरजा भागवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर पैसा लागतोच.परंतु मुलांचे शिक्षण आणि लग्न या दोन बाबींवर प्रचंड प्रमाणात पैसा खर्च होत असतो. त्यातल्या त्यात मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे ही प्रत्येक पालकाची जबाबदारी असते व त्या दृष्टिकोनातून पैशांची तजवीज करून ठेवणे देखील तितकेच महत्त्वाचे असते.
या सगळ्या दृष्टिकोनातून विचार केला तर बरेच व्यक्ती भविष्यकालीन गरजांसाठी आवश्यक पैसा उपलब्ध व्हावा याकरिता काही योजनांच्या माध्यमातून गुंतवणूक करतात. या अनुषंगाने बऱ्याच प्रकारच्या गुंतवणूक योजना उपलब्ध आहेत व या रांगेतच आता स्टेट बँक ऑफ इंडियाची एक महत्वपूर्ण योजना असून या योजनेच्या माध्यमातून मुलांचे शिक्षण तसेच लग्नाचे टेन्शन देखील दूर होण्यास मदत होणार आहे.
नक्की वाचा:विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात पदवी शिक्षण 4 वर्षांचे होणार
स्टेट बँक ऑफ इंडियाची चाइल्ड प्लान फिक्स डिपॉझिट योजना
बँक ऑफ इंडियाची चाइल्ड प्लॅन फिक्स डिपॉझिट माध्यमातून एसबीआय लाइफ स्मार्ट चॅम्प इन्शुरन्स आणि एसबीआय लाइफ स्मार्ट स्कॉलर या दोन महत्त्वपूर्ण योजना आणल्या असून त्या राबवल्या जात आहेत. या योजनांमध्ये मुलांचे शिक्षण व लग्नाच्या दृष्टिकोनातून बचत करता येणे शक्य आहे.
1- एसबीआय लाइफ स्मार्ट चॅम्प इन्शुरन्स- या योजनेच्या माध्यमातून एक लाख रुपये गुंतवून एक कोटी रुपये मिळवता येणे शक्य आहे. यामध्ये तुम्हाला मासिक, तीमासिक,सहामाही आणि वार्षिक अशा पातळीवर गुंतवणूक करता येणे शक्य आहे. या योजनेचा लाभ किमान 21 ते कमाल 50 वय असलेली कोणती व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते. या योजनेमध्ये मुलाचे वय शून्य ते तेरा वर्ष असणे गरजेचे आहे.
नक्की वाचा:EPFO: PF खातेधारकांसाठी खुशखबर ! सरकारने केली ही मोठी घोषणा…
या योजनेमध्ये मुलाचे सज्ञान होण्याचे वय 21 वर्षे ठेवण्यात आले असून मुलाचे वय जेव्हा अठरा वर्षे होईल तेव्हा चार वार्षिक टप्प्यांमध्ये सदर रक्कम दिली जाणार आहे. जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली तर विम्याचा लाभ देखील मिळतो. समजा एखाद्या लाभार्थ्याचा जर दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला तर या योजनेच्या माध्यमातून विमा रकमेच्या 105 टक्क्यांपर्यंत रक्कम मिळू शकते.
2- एसबीआय लाइफ स्मार्ट स्कॉलर- ही योजना एसबीआय लाइफची वैयक्तिक, युनिट लिंक्ड, नॉन पार्टिसिपेटिंग जीवन विमा योजना असून यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी पालकाचे वय किमान 18 ते कमाल 57 वर्ष आणि मुलाचे वय शून्य ते 17 वर्षे असणे गरजेचे आहे.
या योजनेच्या पॉलिसीमध्ये किमान आठ ते कमाल पंचवीस वर्षे गुंतवणूक करता येते. यामध्ये मुलाच्या परिपक्वता वय हे 18 ते 25 वर्षे आहे. या योजनेमध्ये तुम्हाला अपघात विम्याचा लाभ देखील दिला जातो.
Published on: 11 December 2022, 09:21 IST