जर आपण एकंदरीत महाराष्ट्राचाच नव्हे तर भारताचा विचार केला तर सुशिक्षित बेरोजगारांची संख्या ही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आपल्याला माहित आहेच की, दरवर्षी कॉलेजमधून पदवी घेऊन लाखोंच्या संख्येने तरुण बाहेर पडतात.परंतु या तुलनेने उपलब्ध नोकऱ्यांचे संख्या फारच कमी आहे. त्यामुळे तरुणांना नोकरीच्या शोधासाठी अक्षरशः वणवण भटकण्याची वेळ येते.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जरी तरुणांनी व्यवसाय उभा करायचा ठरवला तर त्यासाठी लागणारे भांडवल पुरेशा प्रमाणात स्वतःचे असेलच असे नाही.
या सगळ्या समस्या वर शासनाच्या विविध प्रकारच्या योजना आहेत. परंतु बऱ्याचदा अशा योजनांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत नाही किंवा बऱ्याचशा योजनांच्या बाबतीत कर्ज मंजुरीची प्रक्रिया खूपच क्लिष्ट असल्यामुळे बरेचजण अशा योजनांकडे पाठ फिरवतात.
परंतु जर आपल्याला काही करायचे असेल तर थोडा त्रास सहन करणे हेदेखील तेवढेच गरजेचे असते. या लेखामध्ये आपण अशाच एका उपयुक्त योजनेबद्दल माहिती देणार आहोत जे तरुणांना व्यवसाय उभारणीसाठी मदत करते.
युवकांसाठी महत्त्वाची योजना
ग्रामीण भागातील तरुणांना स्वतःचा व्यवसाय उभा करता यावा यासाठी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत खादी व ग्रामोद्योग महामंडळ मार्फत कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
नक्की वाचा:Bussiness For Women: 2 लाख रुपये गुंतवणूक करून घरी सुरू करा 'हा'उद्योग,मिळेल लाखात नफा
या ठिकाणी करू शकता अर्ज
जर तुम्हाला स्वतःच्या पायावर उभे राहायचे असेल व तुम्हाला एखादा व्यवसाय उभा करायचा असेल तर तुम्ही https://.www.pmegp.online/ या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करू शकतात व संबंधित योजनेचा लाभ घेऊ शकतात.
या माध्यमातून किती मिळते कर्ज?
प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून खादी व ग्रामोद्योग महामंडळामार्फत देण्यात येणारे कर्ज उत्पादन क्षेत्रासाठी 50 लाख रुपये, सेवा क्षेत्रातील उद्योग करायचा असेल तर वीस लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येत आहे.
तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून 10 ते 25 लाखांपर्यंत कर्ज या माध्यमातून दिले जाणार आहे. जर तुम्हाला देखील या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर या योजनेच्या अधिक माहिती मिळवण्यासाठी तुमच्या खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा.
Published on: 11 September 2022, 11:33 IST