Government Schemes

पोस्ट ऑफिस मध्ये अशा काही योजना आहेत, ज्या तुम्हाला काही वर्षात करोडपती बनवू शकतात. तुम्ही चांगला परतावा देणारा दीर्घकालीन गुंतवणूक पर्याय शोधत असाल तर पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) हा एक चांगला पर्याय असू शकतो.

Updated on 10 July, 2022 7:01 PM IST

पोस्ट ऑफिस मध्ये अशा काही योजना आहेत, ज्या तुम्हाला काही वर्षात करोडपती बनवू शकतात. तुम्ही चांगला परतावा देणारा दीर्घकालीन गुंतवणूक पर्याय शोधत असाल तर पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) हा एक चांगला पर्याय असू शकतो.

 पोस्ट ऑफिस PPF वर इतके मिळते व्याज 

 पोस्ट ऑफिस सेविंग स्कीम पीपीएफ दरवर्षी 7.1 टक्के चक्रवाढ व्याज देते. या योजनेचा परिपक्वता कालावधी 15 वर्षाचा आहे. त्यानंतर ते आणखी 5 वर्षासाठी वाढवता येईल. जर तुम्हाला 15 पंधरा वर्षानंतर पैशाची गरज नसेल, तर तुम्ही या कालावधीत पुढे जाऊ शकता.

नक्की वाचा:Kvp Scheme: पोस्टाच्या 'या'योजनेत करा गुंतवणूक आणि करा पैसे दुप्पट,वाचा या योजनेविषयी सविस्तर माहिती

इतकी गुंतवणूक करू शकता

 या योजनेत तुम्ही दरवर्षी जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये गुंतवू शकता. एका वर्षात 1.50 लाख रुपये जमा करण्याऐवजी तुम्ही मासिक 12,500 रुपये देखील जमा करू शकता.

याशिवाय तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम 80च अंतर्गत PPF वर कर सूट देखील मिळू शकतो. त्याच्या व्याजावर कमावलेल्या पैशावर कर आकारला जात नाही. बचत योजनेत 22.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 वर्षाच्या मॅच्युरिटी वर तुम्हाला 18 लाख रुपयांचे व्याज मिळेल.

नक्की वाचा:Lic Scheme: एलआयसीच्या या योजनेतुन दरमहा मिळणार 12 हजार, वाचा डिटेल्स

इतके व्याज मिळू शकते

 तुम्ही या योजनेत दरमहा 12,500 रुपये गुंतवल्यास तुम्हाला एका वर्षात 1.50 लाख रुपये मिळतील. त्याच वेळी,15 वर्षांमध्ये एकूण गुंतवणूक 22.50 लाख रुपये होईल, ज्यावर तुम्हाला 7.1 टक्के वार्षिक व्याजदर मिळेल.

मुदतपूर्तीच्या  वेळी एकूण निधी 40.70 लाख रुपये असेल, ज्यामध्ये 18.20 लाख रुपयांच्या व्याजाचा लाभ असेल.

5) एवढे पैसे 25 वर्षांनी मिळतील :-

 25 वर्षासाठी दरमहा 12,500 रुपये जमा केल्यास 40.70 लाखांची रक्कम दुप्पट होते. जर यावरील वार्षिक व्याज दर 7.1 टक्क्यांवरून लागू असेल, तर 25 वर्षात एकूण गुंतवणूक रक्कम 37.50 लाख रुपये आहे. आणि व्याजाच्या लाभासह 62.50 लाख रुपये उपलब्ध होतील, म्हणजेच 1.03 कोटी रुपये मॅच्युरिटी वर उपलब्ध होतील.

नक्की वाचा:Loan News:10 म्हशिंची डेअरी उघडा आणि 'या' योजनेच्या माध्यमातून मिळवा 7 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज

English Summary: this is post office scheme give good return in some year
Published on: 10 July 2022, 07:01 IST