Government Schemes

मित्रांनो देशातील मुली आणि महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे. या योजनांच्या माध्यमातून सरकार मुलींच्या शिक्षणासाठी आणि लग्नाच्या खर्चासाठी आर्थिक मदत करते. त्याचप्रमाणे, आज आम्ही सरकारद्वारे चालवल्या जाणार्‍या विशेष योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये राज्य सरकार मुलीच्या लग्नासाठी 51000 रुपयांची आर्थिक मदत करणार आहे.

Updated on 16 June, 2022 7:29 PM IST

मित्रांनो देशातील मुली आणि महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे. या योजनांच्या माध्यमातून सरकार मुलींच्या शिक्षणासाठी आणि लग्नाच्या खर्चासाठी आर्थिक मदत करते.  त्याचप्रमाणे, आज आम्ही सरकारद्वारे चालवल्या जाणार्‍या विशेष योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये राज्य सरकार मुलीच्या लग्नासाठी 51000 रुपयांची आर्थिक मदत करणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागेल ते देखील आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या विषयी.

कन्या विवाह योजना काय आहे?

पुन्हा एकदा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्री कन्या विवाह योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना 21 एप्रिल 2022 पासून पुन्हा एकदा कार्यान्वित होणार आहे. कन्या विवाह योजनेंतर्गत मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी राज्य सरकार 51 हजार रुपये देणार आहे. ही रक्कम घरगुती वस्तू बनवण्यासाठी, काही रोख रक्कम आणि इतर व्यवस्था करण्यासाठी वापरली जाऊ शकते.

तुम्हाला सांगतो की ही योजना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सुरू केली होती. या योजनेद्वारे राज्यातील गरीब, गरजू कुटुंबातील वडिलांशिवाय मुली, घटस्फोटित महिलांच्या लग्नासाठीही आर्थिक मदत केली जाते. कन्या विवाह योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे अर्ज करू शकतात. जर अर्जदार मुलगी बीपीएल कुटुंबातील असेल तर मुलीच्या नावावर 5000 रुपयांचा धनादेश किंवा डिमांड ड्राफ्ट देखील दिला जातो. या योजनेंतर्गत लाभार्थी मुलींना 38 हजार रुपयांचे सामान, 11 हजार रुपयांचा धनादेश आणि 6 हजार रुपयांची रोख रक्कम विवाह विषयक खर्चासाठी दिली जाते.

Monsoon Update: देशातील 'या' भागात मान्सूनची दमदार एंट्री, राज्यात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा

कन्या विवाह योजनेसाठी पात्रता काय आहे:

या योजनेसाठी मुलीचे किमान वय 18 वर्षे आणि वराचे वय 21 वर्षे असावे. तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार मुलीचे नाव समग्र पोर्टलवर नोंदणीकृत करणे आवश्यक आहे. याशिवाय, अर्जदाराचे बँक खाते असणे अत्यंत आवश्यक आहे, कारण योजनेत पैसे अर्जदाराच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातात.

Maize Variety: मक्याच्या सुधारित जाती आणि त्यांच्या विशेषता

कन्या विवाह योजनेसाठी अर्ज कसा करावा:

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कन्या विवाह योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. यानंतर, वेबसाइटच्या होम पेजवरून अर्ज उघडावा लागणार आहे आणि त्यात विचारलेली सर्व माहिती भरावी लागणार आहे. त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा. अशा प्रकारे अर्जदाराचा अर्ज पूर्ण होईल.

मोदी सरकार महाराष्ट्रातील जनतेला देतं आहे तब्बल 10 लाखांचं लोन, आजच करा अर्ज

English Summary: this government giving 51 thousand for girls marriage
Published on: 16 June 2022, 07:29 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)