Government Schemes

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार व राज्य सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून अनुदानाच्या स्वरूपात आर्थिक मदत केली जाते.

Updated on 18 May, 2022 9:32 PM IST

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार व राज्य सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून  अनुदानाच्या स्वरूपात आर्थिक मदत केली जाते.

त्यामुळे शेतकऱ्यांना शेती व शेतीशी संबंधित बरीच कामे करण्यासाठी आर्थिक हातभार मिळतो. विविध प्रकारच्या बाबींसाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येते. त्याच पार्श्वभूमीवर  महाराष्ट्रातील बहुतेक भागात उसाची लागवड शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात.  परंतु उसाची तोडणी झाल्यानंतर शिल्लक राहिलेली पाचट बरेच शेतकरी जाळून टाकतात.

परंतुउसाचे पाचट चा वापर जर शेतात खत म्हणून केला तर जमिनीची सुपीकता वाढते.याच दृष्टिकोनातून उसाचे पाचट कुट्टी करण्यासाठीजे काही यंत्र लागते त्या यंत्राच्या खरेदीसाठी शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना1 लाख 25 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.या लेखामध्ये आपण  या यंत्राच्या अनुदानासाठी कशा पद्धतीने ऑनलाईन अर्ज करावा लागतो आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी या यंत्राच्या अनुदानासाठी अर्ज करू शकतात, याबद्दल या लेखात माहिती घेऊ.

 ऊस पाचट कुट्टी यंत्र वर मिळणार इतके अनुदान

 याबाबतचा शासन निर्णय 13 मे 2022रोजी घेण्यात आला होता.या निर्णयाच्या अनुषंगाने कृषी उन्नती योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गतवाणिज्यिक पिकांमध्ये कापूस आणि ऊस या पिकासाठी 2022-23या वर्षासाठी वार्षिक कार्यक्रम राबवण्यासाठी सात कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली.

याअंतर्गत ऊस पाचट कुट्टी यंत्र साठी अनुदान दिले जाणार आहे. यामध्ये अल्पभूधारक शेतकरी,  एस सी/ एसटी वर्गातील शेतकरी या सर्व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 50%किंवा एक लाख 50 हजार रुपये अशा प्रकारे अनुदान दिले जाते.तसेच बहुभुधारक शेतकरी व इतर शेतकऱ्यांना 40 टक्के किंवा जास्तीत जास्त एक लाख रुपये अनुदान या माध्यमातून दिले जाणार आहे.

 या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत

1- यासाठी तुम्हाला महाडीबीटी फार्मर स्कीम ऑनलाइन पोर्टल वर एक फॉर्म भरावा लागेल व यासाठी तुम्हाला अगोदर लॉग इन करावे लागेल.

2- लोगिन करण्यासाठी तुम्हाला यूजर आयडी पासवर्ड टाकावा लागेल. जर तुमच्याकडे लॉगिन पासवर्ड नसेल तर तुम्ही आधार कार्ड च्या ओटीपी द्वारे लॉगिन करू शकता. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला आवश्यक ती सगळी माहिती व्यवस्थित भरावी लागते.

3- यामध्ये तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण हा पर्याय निवडावा लागेल व या योजने संबंधित असलेल्या सर्व अटी मान्य करावे लागतील.

4- हे सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्ही भरलेला ऑनलाइन फॉर्म सबमिट करून तुमच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण करु शकतात.

5- यामध्ये शेतकऱ्याला लॉटरी लागल्यानंतर अर्ज पुढे विनर असे दाखवले जाईल. त्यानंतर एसेमेस आल्यावर कृषी यांत्रिकी करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे भरावे लागतील व त्यानंतर पूर्वसंमती दिले जाईल.

6-पूर्व संमती मिळाल्यानंतर या यंत्राची खरेदी केलेले बिल अपलोड केले की या योजनांतर्गत अनुदानाचा लाभ दिला जाईल.

 या जिल्ह्यातील शेतकरी करू शकतात अर्ज

 या योजनेच्या माध्यमातून कृषी विभाग शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रमाणात जमिनी मध्ये पाचट गाडून आणि ती कुजून त्याचे कंपोस्ट खत तयार करणे व त्या दृष्टीने योग्य पद्धतीने विल्हेवाट लावून खत तयार करणे यासाठी शासनाचा प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे.

शेतकऱ्यांनी मागणी केली तर त्यांना ऊस पाचट कुट्टी यंत्र साठी अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेच्या अंतर्गत ऊस पिकासाठीबीड, हिंगोली, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, जालना, औरंगाबाद या जिल्ह्यात मधील शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:Gram Crop Veriety:'या' हरभरा आणि काबुली हरभरा च्या जाती आहेत बंपर उत्पादन देणाऱ्या, वाचा माहिती

नक्की वाचा:मिरचीच्या 'या' जातींची लागवड करा अन मिळवा भरघोस उत्पादन आणि नफा

नक्की वाचा:दिलासादायक बातमी! खाद्यतेलाच्या किमती पुढील पंधरवड्यापासून कमी होण्यास होईल सुरुवात

English Summary: this district get subsidy for us paachat kutti machin so hurry for online application
Published on: 18 May 2022, 09:32 IST