Government Schemes

अटल पेन्शन योजना ही केंद्र सरकारची एक पेन्शन योजना असून योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती व या माध्यमातून दरमहा पेन्शन दिली जाते. असंघटित क्षेत्रामध्ये जे लोक काम करतात अशा लोकांना पेन्शनची सुविधा या योजनेच्या माध्यमातून मिळते. परंतु आता याबाबत एका अहवालात म्हटले आहे की, केंद्रीय अर्थ मंत्रालयाने निर्णय घेतल्या नुसार जे व्यक्ती आयकर भरतात ते आता अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाहीत व हा जो नवीन नियम आता घेण्यात आला आहे तो 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होत असल्याचे देखील अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे व या निर्णयाची राजपत्र अधिसूचना 10 ऑगस्ट रोजी जारी करण्यात आली आहे.

Updated on 11 August, 2022 2:03 PM IST

अटल पेन्शन योजना ही केंद्र सरकारची एक पेन्शन योजना असून योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती व या माध्यमातून दरमहा पेन्शन दिली जाते. असंघटित क्षेत्रामध्ये जे लोक काम करतात अशा लोकांना पेन्शनची  सुविधा या योजनेच्या माध्यमातून मिळते.

परंतु आता याबाबत एका अहवालात म्हटले आहे की, केंद्रीय अर्थ मंत्रालयाने निर्णय घेतल्या नुसार जे व्यक्ती आयकर भरतात ते आता अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाहीत व हा जो  नवीन नियम आता घेण्यात आला आहे तो 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होत असल्याचे देखील अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे व या निर्णयाची राजपत्र अधिसूचना 10 ऑगस्ट रोजी जारी करण्यात आली आहे.

नक्की वाचा:Goverment Scheme: केंद्र सरकारच्या 'या' योजनेचा लाभ घ्या आणि पती-पत्नी मिळून मिळवा दरवर्षी 72 हजार रुपये पेन्शन

या बाबतीत असलेल्या नियमांचा विचार केला तर त्यानुसार, कोणताही भारतीय नागरिक जो आयकर कायद्याअंतर्गत कर भरतो, अशा व्यक्तींना आता एक ऑक्टोबर नंतर अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज करता येणार नाही.

तसेच एक आक्टोबर नंतर अटल पेन्शन योजनेच्या माध्यमातून अर्ज करणारी व्यक्ती आयकर च्या कक्षेत आली तर त्याचा अर्ज आणि खाते ताबडतोब बंद करण्यात येईल, असे देखील नियमात म्हटले आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे जर पेन्शनचे पैसे खात्यामध्ये जमा झाले असतील तर तेही परत करावे लागणार आहेत.

नक्की वाचा:सेंद्रिय शेती करायची आहे ना? तर नका घेऊ टेंशन,'या' योजनेची होईल तुम्हाला मदत

 या योजनेचे पात्रता कशी आहे?

 प्रत्येक भारतीय नागरिक योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतो मात्र आता आयकर बाबत नवीन नियम लागू करण्यात आला आहे.

अर्ज करणाऱ्या चे वय 18 ते 40 वर्षाच्या दरम्यान असावे तसेच अर्जदाराचे बँकेत बचत खाते असणे देखील गरजेचे आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे मोबाईल क्रमांक व ज्या बँकेत तुम्हाला अटल पेन्शन योजना साठी अर्ज करायचा आहे त्या बँकेला मोबाईल क्रमांक देणे आवश्यक असते.

या योजनेच्या माध्यमातून एक हजार ते पाच हजार रुपये पेन्शन दिली जाते. ही योजना पेन्शन फंड नियामक विकास प्राधिकरण द्वारे चालवली जाते.

परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही बँकेत एपीवाय खाते उघडावे लागते. त्यामुळे पेन्शनचे पैसे त्या बँकेत जमा होतील आणि नंतर तुम्हाला पेन्शन मिळते. एकदा तुमचा ए पी वाय फॉर्म रजिस्टर झाल्यानंतर तुमचे खाते ऑटोमॅटिक डेबिट होत राहते.

नक्की वाचा:शेळीपालन व्यवसाय सुरू करण्याची संधी! ठाणबंद पद्धतीने शेळीपालन योजनेतून 8 हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना मिळणार लाभ

English Summary: some rule change in atal pention scheme by central goverment
Published on: 11 August 2022, 01:46 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)