शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत झालेल्या पिकांची नुकसान भरपाई दिली जाते. यासाठी शेतकऱ्यांना पिकांचे पंचनामे (panchnama damage crops) करून घेण्याची गरज असते. मात्र पिकाच्या नोंदणीबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी विमा कंपनीच्या प्रतिनिधीनी प्रत्येकी 3 हजार रुपये देण्याची मागणी केली, असा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला असल्याने खळबळ उडाली आहे.
अवकाळी, अतिवृष्टी पावसामुळे सोयाबीन (soyabean) उडीद, मूग ,कापूस या हाताला आलेली पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून नुकसानभरपाईची मागणी केली जात आहे.
तर पीक विमा कंपन्यांकडून पंचनामे करण्याची मागणी केली जात आहे. मात्र पंचनामे करण्यासाठी आलेल्या विमा कंपनीचे प्रतिनिधी शेतकऱ्यांकडून पैसे मागत असल्याचा आरोप केला जात आहे.
पावसामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा; हरभरा आणि गहू बियाणे अनुदानावर मिळणार
नांदेडच्या हदगाव तालुक्यातील कोथळा गावात मोठ्याप्रमाणावर पीकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पीक नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी संबधित विमा कंपनीचे प्रतिनिधीनी आले होते. मात्र पिकांचे 100 टक्के नुकसान दाखवण्यासाठी तीन हजार रुपये द्या, अशी मागणी विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडून करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
Horoscope: येणारा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य
शेतकरी देवसरकर यांचा आरोप
अवकाळी पावसाने कोथळा गाव परिसरातील सोयाबिन, उडीद, मूग, कापूस पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. पैनगंगा नदीच्या पुराचे पाणी शेतात घुसल्याने पीकं अक्षरशः वाहून गेली आहे.
या गावातील शेतकरी (farmers) केशवराव नाजुराव देवसरकर यांच्या शेतात सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र त्यांनी पीक विमा काढला असल्याने विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी शेतात जाऊन पाहणी केली.
परंतु विमा प्रतिनिधी यांनी केलेल्या पैश्यांची मागणी पूर्ण न केल्याने त्यांचे पीक विम्याचे कागदपत्र कंपनीच्या प्रतिनिधींनी अक्षरशः फेकून दिली, असा आरोप देवसरकर यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
दिलासादायक! पहिल्या टप्प्यात 37 हजार शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहन अनुदानाचा लाभ
दूध उत्पादक व कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; वारणा सहकारी दूध संघाकडून मिळणार ५४ कोटी रुपये
पोस्ट ऑफिसमधील FD वर बँकेपेक्षा मिळणार जास्त व्याजदर; जाणून घ्या
Published on: 18 October 2022, 10:54 IST