एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर आता कामांचा सपाटा सुरू केला आहे. मुख्यमंत्र्यांची प्रशासनाच्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसोबत आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली आहे. यावेळी मराठवाड्यासाठी आणि राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यामुळे आता येथील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची मोठी समस्या आहे. यामुळे पुराचे पाणी त्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सांगली आणि कोल्हापूरातील पूराचे पाणी मराठवाड्यात वळवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात आराखडा तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. यामुळे आता ही योजना लवकरच सुरू होणार आहे. अनेकदा याबाबत चर्चा होऊन देखील प्रत्यक्षात मात्र पुढे काहीच झाले नाही. आतातरी कायतरी होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. या बैठकीत जागतिक बँकेचे अधिकारीही उपस्थित होते.
सांगली आणि कोल्हापूरमध्ये दोन वर्षापासून पूर येत आहे. यासाठी सरकारकडून उपाययोजना करण्यात येणार असून हे पूराचं पाणी मराठवाड्यात वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे पाणी वाया जात असून याठिकाणी पुरामुळे मोठे नुकसान देखील होत आहे. दरम्यान, पाणी वाटपाचा कायदा पुराच्या पाण्याला लागू होत नाही म्हणून पुराचे पाणी मराठवाड्यात वळवण्यात येणार आहे.
७० एकर शेतीला लोकवर्गणीतून घातले कुंपण, शेतीच्या नुकसानाला बसणार आळा
याबाबत आता बोगदे तयार करून हे पाणी मराठवाड्यात नेण्यात येणार आहे. या प्रकल्पाला निधी देण्यासाठी जागतिक बँकेने सहमती देखील दर्शवली आहे. या प्रकल्पाचा आराखडा बनवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. यामुळे येथील शेती पाण्याखाली येणार असून शेतकऱ्यांना यामुळे फायदा होणार आहे. तसेच यामुळे कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पूर देखील कमी होईल. यामुळे या योजनेचे अनेक फायदे आहेत.
महत्वाच्या बातम्या;
तरुणांनो संधीचे करा सोनं! रेल्वेत कोणतीही परीक्षा न देता थेट मेगाभरती...
शेतकऱ्यांनो दूध डेअरी उघडण्यासाठी सरकारकडून 7 लाख रुपये मिळणार, असा करा अर्ज
अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 लाख देणारच! शेतकऱ्यांसाठी 15 लाखांची घोषणा..
Published on: 08 July 2022, 11:14 IST