मुंबई : राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या विधानसभेत मांडत आहेत. यावेळी त्यांनी नमो शेतकरी महासन्मान योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत शासनानं अधिक अनुदानाची भर घातली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर मी राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर करतो. या योजनेत केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीत सहा हजार रुपयांची भर घालण्यात येणार आहे. म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना आता दरवर्षी १२ हजार रुपये मिळणार आहेत.
या योजनेचा फायदा राज्यातील १ कोटी १५ लख शेतकऱ्यांना होणार आहे. या योजनेसाठी ६ हजार नऊश कोटी रुपये रक्कम प्रस्तावित केली आहे. तसेच पीकविम्यासाठी त्यांच्या हिश्श्याची रक्कम भरावी लागणार नाही. त्याऐवजी राज्य सरकार तो हिस्सा भरणार आहे. शेतकऱ्यांना एक रुपया भरून योजनेत सहभागी होता येईल.
त्यासाठी ३ ३१२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल. यामध्ये शाश्वती शेती-समृद्ध शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसीसह सर्व समाज घटकांचा विाकस, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास, रोजगार निर्मिती-सक्षम, कुशल रोजगार युवा, पर्यावरणपूरक विकास, अशा अनेक गोष्टी आहेत.
या योजनेत केंद्र सरकारच्या प्रतिवर्ष प्रतिशेतकरी ६,००० रुपयांत राज्य सरकार आणखी ६,००० रुपये भर घालणार आहे. त्यामुळं राज्यातील शेतकऱ्यांना १२,००० रुपये प्रतिवर्षी मिळतील. याचा लाभ १ कोटी १५ लाख शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
त्याने फुकट भाजी विकली, पण त्याच्या डोळ्यातले पाणी कोणाला दिसलेच नाही..
छत्रपती कारखाना लवकरच गतवैभव प्राप्त करणार, नवीन प्रकल्पाच्या कर्जाचा शेवटचा हप्ता राहिला...
कुमकुम भेंडीला ५०० रुपये किलोचा भाव, शेतकऱ्यांना आहे फायदेशीर..
Published on: 09 March 2023, 03:21 IST