Government Schemes

सर्वसामान्य लोकांसाठी आर्थिक गुंतवणूक गरजेची व महत्वाची ठरते. भविष्यासाठी आर्थिक नियोजन आवश्यक आहे. म्हातारपणी खर्चासाठी ठराविक रक्कम महिन्याला आपल्याकडे असणे गरजेच आहे. त्या दृष्टीने गुंतवणुकाचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे.

Updated on 20 July, 2022 4:06 PM IST

सर्वसामान्य लोकांसाठी आर्थिक गुंतवणूक (Financial investment) गरजेची व महत्वाची ठरते. भविष्यासाठी आर्थिक नियोजन आवश्यक आहे. म्हातारपणी खर्चासाठी ठराविक रक्कम महिन्याला आपल्याकडे असणे गरजेच आहे. त्या दृष्टीने गुंतवणुकाचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे.

सर्वसामान्य लोकांसाठी सरकारने अटल पेन्शन योजना 2015 मध्ये सुरु केली आहे. आता 18 ते 40 वर्षांचा कोणताही भारतीय नागरिक यामध्ये गुंतवणूक करू शकतो. सरकारी योजना असल्याने यात कोणत्याही फसवणुकीची चिंता नाही.

मत्स्यपालनासाठी सरकार देतंय 60% अनुदान ; सरकारच्या 'या' योजनेचा घ्या लाभ

अटी आणि शर्ती 

योजनेनुसार वयाच्या 60 वर्षानंतर गुंतवणूकदाराला पेन्शन (Pension) सुरु होईल. या योजनेंतर्गत महिन्याला किमान 1000 रुपये, 2000, रुपये 3000, रुपये 4000 आणि कमाल 5,000 रुपये मिळू शकतात. जर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुमचं बचत खातं (savings account) आवश्यक आहे. तसेच आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांकाची देखील आवश्यकता आहे.

वयाच्या 18 व्या वर्षी अटल पेन्शन (Pension) योजनेत गुंतवणूक सुरु केली तर 60 व्या वर्षी त्या व्यक्तीला दरमहा 5000 रुपये पेन्शन मिळेल. यासाठी त्याला फक्त 210 रुपये प्रति महिना जमा करावे लागतील. म्हणजे दररोज 7 रुपये जमा करुन तुम्ही 5000 रुपयांची पेन्शन मिळवू शकता. दरमहा 1000 रुपये मासिक पेन्शनसाठी महिन्याला केवळ 42 रुपये जमा करावे लागतील.

फोन हरवलाय किंवा चोरीला गेलाय? मग घाबरू नका, UPI अकाऊंट करा असं 'Deactivate'

2000 रुपयांच्या पेन्शनसाठी महिन्याल 84 रुपये, 3000 रुपयांसाठी 126 रुपये आणि 4000 रुपयांच्या मासिक पेन्शनसाठी 168 रुपये दरमहा जमा करावे लागतील. कर लाभ देखील मिळेल अटल पेन्शन योजनेत (Atal Pension Scheme) गुंतवणूक करणाऱ्या लोकांना आयकर कायदा 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतचा कर लाभही मिळतो. यातून करपात्र उत्पन्न वजा केले जाते.

रंगीत भाताची शेती करून 'हा' शेतकरी कमवतोय लाखोंमध्ये उत्पन्न

English Summary: Save just Rs 7 per day get 5000 monthly pension
Published on: 20 July 2022, 04:02 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)