Government Schemes

केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी म्हणजेच कृषी क्षेत्रासाठी विविध प्रकारच्या लाभदायक आणि फायदेशीर योजना राबवल्या जातात. जेणेकरून शेतकऱ्यांना शेती करत असताना येणाऱ्या समस्या कमी व्हाव्यात व शेतकऱ्यांना जास्तीच्या आर्थिक उत्पादन मिळावी हा त्यामागचा उद्देश असतो. या पार्श्वभूमीवर बँकांकडून देखील विविध प्रकारच्या योजना शेतकरी वर्गासाठी राबवल्या जातात.

Updated on 20 September, 2022 12:37 PM IST

केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी म्हणजेच कृषी क्षेत्रासाठी विविध प्रकारच्या लाभदायक आणि फायदेशीर योजना राबवल्या जातात. जेणेकरून शेतकऱ्यांना शेती करत असताना येणाऱ्या समस्या कमी व्हाव्यात व शेतकऱ्यांना जास्तीच्या आर्थिक उत्पादन मिळावी हा त्यामागचा उद्देश असतो. या पार्श्वभूमीवर बँकांकडून देखील विविध प्रकारच्या योजना शेतकरी वर्गासाठी राबवल्या जातात.

अशीच एक महत्त्वाची योजना पंजाब नॅशनल बँकने आणले असून जी शेतकऱ्यांना फायद्याची ठरू शकते. या लेखामध्ये आपण नेमकी ही योजना काय आहे याबद्दल माहिती घेऊ.

नक्की वाचा:Post Office Scheme : शेतकऱ्यांसाठी पोस्ट ऑफिसची खास योजना; आता पैसे होणार डबल

पंजाब नॅशनल बँकेची योजना

 पंजाब नॅशनल बँकेने आपल्या अधिकृत ट्विटमध्ये म्हटले आहे की शेतीक्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पीएनबीने किसान तत्काळ कर्ज योजना आणली आहे. यामध्ये 50000 जास्तीत जास्त कर्जाच्या विद्यमान मर्यादेच्या 25 टक्के कर्ज सुरक्षतेच्या कुठल्याही प्रकारची हमी न देता व कमीत कमी कागदपत्रे देऊन या योजनेचा लाभ मिळू शकतो.

याबाबत बँकेने म्हटले आहे की,या योजनेच्या माध्यमातून शेतीसाठी किंवा घरगुती गरजांसाठी जी काही पैशांची गरज आहे या योजनेचा लाभ घेऊन भागवू शकतात. पंजाब नॅशनल बँकेकडून पीएनबी किसान तत्काळ कर्ज योजनेची सुविधा ग्राहकांना पुरवत आहे. या योजनेअंतर्गत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील. पंजाब नॅशनल बँकेने या बाबतीत म्हटले आहे की या योजनेच्या माध्यमातून शेतीसाठी किंवा घरगुती गरजांसाठी पैशांची गरज आहे तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

नक्की वाचा:Solar Pump Yojana: मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, सौरपंपावर 60 टक्क्यांची सूट, असा करा अर्ज

 कुणाला मिळेल याचा फायदा?

 जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही कृषी क्षेत्रात काम करणारे शेतकरी किंवा शेतजमिनीचे भाडेकरू असणे आवश्यक आहे.  याबाबत बँकेच्या म्हणण्यानुसार फक्त शेतकरी किंवा शेतकरी गट, ज्यांच्याकडे आधीच किसान क्रेडिट कार्ड आहे त्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल.

यासाठी संबंधित व्यक्ती कडे मागील दोन वर्षाचे अचूक बँक रेकॉर्ड असणे आवश्यक आहे. याबाबत बँकेच्या अधीसूचनेचा विचार केला तर शेतकऱ्यांना किसान तात्काळ कर्ज योजनेअंतर्गत त्यांच्यात विद्यमान कर्ज मर्यादेचे 25 टक्‍क्‍यांपर्यंत कर्ज दिले जाईल व यामध्ये 50 हजार रुपये कमाल मर्यादा आहे.

या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांना यामध्ये कुठल्याही प्रकारची गोष्ट तारण ठेवण्याची गरज नाही किंवा कोणत्याही प्रकारचे सेवा शुल्क देण्याची गरज भासणार नाही. या योजने अंतर्गत शेतकरी जे कर्ज घेतील त्याचा परतफेड कालावधी हा पाच वर्षाचा आहे.

ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे असे शेतकरी पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत जाऊन अर्ज करू शकतात वा ऑनलाईन अर्ज देखील बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर करता येईल.

नक्की वाचा:शेतकऱ्यांना 25 टक्के वाढीव नुकसान भरपाई मिळणार; सरकारकडून अधिसूचना जारी

English Summary: punjaab national bank start kisan tatkal karj yojana for farmer
Published on: 20 September 2022, 12:37 IST