Government Schemes

मित्रांनो जसं की आपणांस ठाऊकच आहे भारत हा एक कृषीप्रधान देश (Agriculture Country) आहे आणि आपल्या देशातील जवळपास 55 ते 60 टक्के लोकसंख्येच्या उत्पन्नाचा स्रोत हा शेती (Farming) किंवा शेतीसंबंधित व्यवसाय (Agriculture Business) हाच आहे. यामुळेच सरकारकडून (Government Scheme) कोट्यवधी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी तसेच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अनेक योजना (Farmers Scheme) राष्ट्रीय स्तरावर कार्यान्वित केल्या जातात.

Updated on 14 May, 2022 4:31 PM IST

मित्रांनो जसं की आपणांस ठाऊकच आहे भारत हा एक कृषीप्रधान देश (Agriculture Country) आहे आणि आपल्या देशातील जवळपास 55 ते 60 टक्के लोकसंख्येच्या उत्पन्नाचा स्रोत हा शेती (Farming) किंवा शेतीसंबंधित व्यवसाय (Agriculture Business) हाच आहे. यामुळेच सरकारकडून (Government Scheme) कोट्यवधी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी तसेच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अनेक योजना (Farmers Scheme) राष्ट्रीय स्तरावर कार्यान्वित केल्या जातात.

शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी तसेच त्यांचे जीवनमान सोयीचे व्हावे हाच या योजनेचा प्रमुख उद्देश असतो. देशात अशा अनेक शेतकरी कल्याणाच्या योजना आहेत. अशाच योजनेपैकी एक योजना आहे (PM Kisan Sanman Nidhi Yojana) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात.

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, हे सहा हजार रुपये दर चार महिन्यांच्या अंतराने दोन हजार रुपये याप्रमाणे तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर केंद्र सरकारकडून वर्ग केले जातात. आताचं हाती आलेल्या माहितीनुसार, या योजनेचा 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर कोणत्याही दिवशी पाठवला जाऊ शकतो.

11 वा हप्ता कोणत्याही दिवशी येऊ शकतो

एप्रिल महिन्यातच 11वा हप्ता हस्तांतरित होईल, अशी अपेक्षा होती, परंतु अनेक शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न झाल्याने त्याला विलंब होत आहे. पीएम किसान योजनेच्या पहिल्या हप्त्याचे पैसे 1 एप्रिल ते जुलै दरम्यान पाठवले जातात. दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान येतो, तर तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च दरम्यान सरकारद्वारे हस्तांतरित केला जातो.

आम्ही आपणांस कळवू इच्छितो की, गेल्या हप्त्याचे अर्थात 10व्या हफ्त्याचे पैसे 1 जानेवारी 2022 रोजी या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले होते.

आता 31 मे पर्यंत ई-केवायसी करून घ्या

मित्रांनो पीएम किसान सन्मान योजना या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेत मध्यंतरी विशेषता 10 व्या हप्त्यादरम्यान अनेक अनियमितता उघडकीस आल्या. पात्र नसलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे गेल्याची बातमीही आली. आता ताजी बातमी पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवर आली आहे की 11 व्या हप्त्यासाठी ई-केवायसी अनिवार्य आहे.

सरकारने ई-केवायसीची अंतिम तारीख 31 मे पर्यंत वाढवली आहे काही काळापूर्वी आधार आणि ओटीपीद्वारे ई-केवायसी काही दिवसांसाठी बंद करण्यात आली होती, त्यानंतर ती पुन्हा सुरू करण्यात आली आहे. ऑनलाईन व्यतिरिक्त शेतकरी ऑफलाइन देखील ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात. यासाठी त्यांना जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

English Summary: PM Kisan Yojana: Important information on PM Kisan's website; What exactly is hidden in the information?
Published on: 14 May 2022, 04:31 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)