Government Schemes

PM Kisan Update: केंद्र सरकारने (Central Goverment) देशातील शेतकऱ्यांसाठी (Farmers) पंतप्रधान सन्मान निधी योजना (PM Kisan scheme) चालू केली आहे. या योजनेतून वर्षाकाठी ६००० हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर २००० हजार रुपयांच्या हफ्त्याने जमा होत आहेत. त्यामुळे लाखों शेतकऱ्यांना या योजनेतून फायदा होत आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी (Farming) आर्थिक संकट येऊ नये यासाठी सरकारने ही योजना चालू केली आहे.

Updated on 20 July, 2022 11:46 AM IST

PM Kisan Update: केंद्र सरकारने (Central Goverment) देशातील शेतकऱ्यांसाठी (Farmers) पंतप्रधान सन्मान निधी योजना (PM Kisan scheme) चालू केली आहे. या योजनेतून वर्षाकाठी ६००० हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर २००० हजार रुपयांच्या हफ्त्याने जमा होत आहेत. त्यामुळे लाखों शेतकऱ्यांना या योजनेतून फायदा होत आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी (Farming) आर्थिक संकट येऊ नये यासाठी सरकारने ही योजना चालू केली आहे.

तुम्ही देखील PM किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सरकारने या योजनेत आतापर्यंत अनेक बदल केले आहेत. जर तुम्हालाही या योजनेचा लाभ मिळत असेल तर त्यासंबंधीचे मोठे काम ताबडतोब करा, अन्यथा तुमचा पुढचा हप्ता अडकेल. जर तुम्ही आतापर्यंत या योजनेअंतर्गत ekyc केले नसेल तर ते लवकर करा, कारण ekyc ची शेवटची तारीख जवळ आली आहे.

केंद्र सरकारने घोषणा केली

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी केंद्र सरकारने आता eKYC अनिवार्य केले आहे. त्यासाठी सरकारने ३१ जुलैची मुदत दिली आहे. पीएम किसान पोर्टलवर (pmkisan.gov.in) ही माहिती देण्यात आली आहे. पीएम किसान वेबसाइटवरील फ्लॅशनुसार, 'सर्व PMKISAN लाभार्थ्यांसाठी eKYC अंतिम मुदत 31 जुलै 2022 आहे'. हे लक्षात घेण्यासारखे आहे की यापूर्वी त्याची अंतिम मुदत 31 मे 2022 होती. अशा परिस्थितीत, जर तुम्ही अद्याप ekyc केले नसेल तर आजच करा. सरकार आता मुदत वाढवण्याच्या मनस्थितीत नाही.

Tricky Questions: राष्ट्रपतीची निवडणूक लढवण्यासाठी कमाल आणि किमान वय किती आहे?

ई-केवायसीशिवाय पैसे मिळणार नाहीत

ई-केवायसीशिवाय तुमचा पुढील हप्ता अडकू शकतो. वास्तविक, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 11 वा हप्ताही जारी करण्यात आला आहे. पीएम किसान पोर्टलवर असे सांगण्यात आले आहे की, आधार आधारित ओटीपी प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांना किसान कॉर्नरमधील ई-केवायसी पर्यायावर क्लिक करावे लागेल.

शेतकऱ्यांना तातडीने 50 हजार रुपये द्या ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची एकनाथ शिंदेंकडे मागणी

बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी जवळच्या CSC केंद्राला (CSC Centre) भेट द्यावी लागेल. हे काम तुम्ही तुमच्या मोबाईल, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवरून घरी बसूनही करू शकता. त्याची प्रक्रिया जाणून घेऊया.

1. आधार आधारित OTP प्रमाणीकरणासाठी किसान कॉर्नरमधील 'EKYC' पर्यायावर क्लिक करा
2. बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधा.
3. तुम्ही तुमच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरच्या मदतीने ते घरी बसून पूर्ण करू शकता.
4. यासाठी प्रथम तुम्ही https://pmkisan.gov.in/ पोर्टलवर जा.
5. उजव्या बाजूला तुम्हाला असे टॅब आढळतील.
6. E-KYC वर लिहिलेले असेल, जिथे तुम्ही ekyc करू शकता

महत्वाच्या बातम्या :
Farming Technique : शेतकरी आणि व्यवसायिकांचे अच्छे दिन ! फळे पिकवण्याचे नवे तंत्र बाजारात; सरकारकडून सबसिडीही
IMD Alert : पुढील ३ दिवस या राज्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस ! IMD चा अलर्ट जारी

English Summary: PM Kisan Update: Big information about PM Kisan!
Published on: 20 July 2022, 11:46 IST