Government Schemes

PM Kisan Tractor Yojana: देशभरातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यांचे ट्रॅक्टरचे स्वप्न दिवाळीच्या मुहूर्तावर साकार होऊ शकते. शेतकर्‍यांना त्यांची ट्रॅक्टरची स्वप्ने साकार करण्यासाठी शासन मोठ्या प्रमाणात मदत करत आहे.

Updated on 08 October, 2022 10:52 AM IST

PM Kisan Tractor Yojana: देशभरातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यांचे ट्रॅक्टरचे स्वप्न दिवाळीच्या मुहूर्तावर साकार होऊ शकते. शेतकर्‍यांना त्यांची ट्रॅक्टरची (tractor) स्वप्ने साकार करण्यासाठी शासन मोठ्या प्रमाणात मदत करत आहे.

शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करता यावे यासाठी ट्रॅक्टर अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शासनाकडून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर 20 ते 50 टक्के अनुदान दिले जाते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि लहान शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

या योजनेअंतर्गत राज्य सरकार शेतकऱ्यांकडून अर्ज मागवतात. शेतकऱ्यांना हवे असल्यास केंद्र किंवा राज्य सरकारच्या मदतीने ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ घेऊन ते अर्ध्या किमतीत खरेदी करू शकतात.

 हेही वाचा: गॅस सिलिंडर संदर्भात नवे नियम जारी, आता फक्त 'या' लोकांनाच मिळणार सब्सिडी

किसान ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी आवश्यक पात्रता

१. शेतकऱ्याकडे स्वतःची शेतीयोग्य जमीन असणे आवश्यक आहे.
२. बँक खाते हे आधार आणि पॅन लिंक केलेले खाते असावे.
३. शेतकरी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावे.
४. आधीच ट्रॅक्टर नसावा.
५. एका शेतकऱ्याला फक्त एक ट्रॅक्टर खरेदी केल्यास अनुदान मिळेल.

 हेही वाचा: परतीच्या पावसाचं थैमान, पुढचे 48 तास 'या' भागांमध्ये होणार मुसळधार!

किसान ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

किसान ट्रॅक्टर योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदाराने आपले आधार कार्ड, पॅन कार्ड, आधारशी लिंक केलेला मोबाईल क्रमांक, बँक खाते-तपशील-पासबुकची प्रत, शेतातील खसरा खतौनीची प्रत आणि पासपोर्ट आकाराचा फोटो असणे आवश्यक आहे.

याप्रमाणे अर्ज करा

पात्र शेतकरी ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत त्यांच्या जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्र किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरच्या मदतीने ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करू शकतात. यासोबतच या योजनेशी संबंधित अधिक माहितीसाठी इच्छुक शेतकरी त्यांच्या जिल्ह्यातील जवळच्या कृषी विभाग कार्यालयाशीही संपर्क साधू शकतात.

 हेही वाचा: iPhone 14 Plus वर बंपर ऑफर! 22 हजार रुपयांपेक्षा जास्त मिळतीय सूट, असा घ्या लाभ...

English Summary: PM Kisan Tractor Yojana: Get tractors at half price on Diwali
Published on: 08 October 2022, 10:52 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)