Government Schemes

केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असतात. ज्यामधून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळतो. यामधीलच एक योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना. आज आपण या योजनेविषयी महत्वाची माहिती जाणून घेऊया.

Updated on 08 October, 2022 10:27 AM IST

केंद्र सरकार आणि राज्य सरकार (state government) शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असतात. ज्यामधून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळतो. यामधीलच एक योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना. आज आपण या योजनेविषयी महत्वाची माहिती जाणून घेऊया.

या योजनेविषयी पाहायचे म्हणले तर पीएम किसान योजनेच्या (pm kisan sanman nidhi) लाभार्थ्यांच्या मृत्यूनंतर सरकारने त्यांच्या वारसांना योजनेचा लाभ देण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहे. मृत्यूनंतर लाभ कोणाला मिळणार? याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मिळणाऱ्या नुकसान भरपाईत मोठी वाढ; मिळणार २० लाख रुपयांची मदत

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (scheme) शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात. हे पैसे एका वर्षात दोन-दोन हजार 3 हप्त्यांमध्ये दिले जातात. महत्वाचे म्हणजे या योजनेत कुटुंबातील एका सदस्यालाच लाभ मिळतो.

जर योजनेचा लाभार्थी मरण पावला तर अशा परिस्थितीत पैसे दिले जातील. पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना योजनेचा लाभ देण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; पहिल्याच दिवशी कापसाला मिळाला 11 हजारांचा भाव

वारसांना लाभ असा मिळणार

या योजनेच्या भारत सरकारने (india governemnt) जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार मृतांच्या वारसांना लाभ दिला जाणार आहे. यासाठी अट अशी ठेवण्यात आली आहे की वारसाला पीएम किसान सन्मान निधीच्या पात्रतेत यावे लागेल. त्या शेतकऱ्याच्या वारसाला पोर्टलवर स्वतंत्रपणे नोंदणी करावी लागेल.

विशेष म्हणजे हे वारस शासनाच्या अटींची पूर्तता करतात की नाही हे पाहिले जाणार आहे. शेतकऱ्याच्या वारसांनी या योजनेअंतर्गत असलेल्या नियमांची पूर्तता केल्यास त्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ निश्चितच मिळणार असल्याचे घोषित केले आहे.

महत्वाच्या बातम्या;
सावधान! राज्यात पावसाचा वेग वाढला; हवामान विभागाकडून आज संपूर्ण महाराष्ट्रात 'यलो' अलर्ट जारी
'या' राशींना लागणार मोठी लॉटरी; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! 'या' तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार २२ कोटींची नुकसान भरपाई

English Summary: PM Kisan Samman Fund money after death beneficiaries
Published on: 08 October 2022, 10:23 IST