Government Schemes

PM Kisan: देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. केंद्र सरकारने शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६००० हजार रुपये ४ हफ्त्यांमध्ये दिले जातात. त्यामुळे शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना थोडा का होईना हातभार लागत आहे.

Updated on 10 October, 2022 1:41 PM IST

PM Kisan: देशातील शेतकऱ्यांसाठी (Farmers) केंद्र सरकारकडून (Central Govt) अनेक योजना राबवल्या जात आहेत. केंद्र सरकारने शेती (Farming) क्षेत्राला चालना देण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) सुरु केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६००० हजार रुपये ४ हफ्त्यांमध्ये दिले जातात. त्यामुळे शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना थोडा का होईना हातभार लागत आहे.

ऑक्टोबर महिन्यात 12 वा हप्ता जारी केला जाऊ शकतो

ताज्या अपडेटनुसार, ऑक्टोबर महिन्याच्या कोणत्याही तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता येऊ शकतो. सप्टेंबर महिन्यात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार होती. मात्र, भुलेखांच्या पडताळणीला सध्या विलंब होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे काम अंतिम टप्प्यात आहे.

पीएम किसान सन्मान निधीच्या लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट होऊ शकते. एकट्या उत्तर प्रदेशातून या योजनेसाठी २१ लाख लाभार्थी अपात्र आढळले आहेत. इतर राज्यातही हीच परिस्थिती आहे. मोठ्या प्रमाणात लाभार्थी अपात्र असल्याचे समोर येत आहे. सध्या अशा लोकांना नोटिसा पाठवून आतापर्यंतच्या सर्व हप्त्यांची रक्कम परत करण्यास सांगितले जात आहे.

दिवाळीच्या तोंडावर सोने आणि चांदी खरेदीदारांसाठी खुशखबर! सोने 4300 तर चांदी 19000 रुपयांनी स्वस्त...

लवकरच ई-केवायसी करा

पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवरून ई-केवायसी (e-kyc) करण्‍यासाठी वेळमर्यादा अपडेट काढून टाकण्यात आली आहे. मात्र, आताही ई-केवायसी करणे पूर्णपणे अनिवार्य आहे. जर तुम्ही अशा शेतकऱ्यांपैकी असाल ज्यांनी अद्याप ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, तर ते पीएम किसान योजनेच्या वेबसाइटला भेट देऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

Big Breaking: माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांचे निधन; ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

योजनेशी संबंधित माहितीसाठी येथे क्लिक करा

पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता आता ऑक्टोबर महिन्यातच येईल असे मानले जात आहे. दरम्यान, तुम्हाला या योजनेशी संबंधित काही तक्रार किंवा समस्या असल्यास, तुम्ही पीएम किसान योजना हेल्पलाइन क्रमांक- 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 वर संपर्क साधू शकता. याशिवाय, तुम्ही तुमची तक्रार ई-मेल आयडी (pmkisan-ict@gov.in) वर मेल करू शकता.

महत्वाच्या बातम्या:
क्रूड ऑइलच्या दरात घसरण! आठवड्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किती झाला बदल; जाणून घ्या नवे दर
राज्यात मुसळधार मान्सूनचे सत्र सुरूच! या भागांना यलो अलर्ट जारी

English Summary: PM Kisan: Beneficiaries PM Kisan Yojana 12th installment coming or not? Know more
Published on: 10 October 2022, 01:41 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)