Government Schemes

PM Kisan: केंद्र सरकारने देशातील लाखो शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना सुरु केली आहे. त्यामधून अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. या योजनेतून सरकार वर्षाकाठी शेतकऱ्यांना ६००० हजार रुपये देत आहे. या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात ३ हफ्त्यांमध्ये जमा केले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांना ११ हफ्त्यांचा लाभ मिळाला आहे. लवकरच १२ वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे.

Updated on 30 July, 2022 6:19 PM IST

PM Kisan: केंद्र सरकारने (Central Goverment) देशातील लाखो शेतकऱ्यांसाठी (Farmers) पीएम किसान योजना सुरु केली आहे. त्यामधून अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. या योजनेतून सरकार वर्षाकाठी शेतकऱ्यांना ६००० हजार रुपये देत आहे. या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात ३ हफ्त्यांमध्ये जमा केले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांना ११ हफ्त्यांचा लाभ मिळाला आहे. लवकरच १२ वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi Yojana) करोडो लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. एकीकडे केंद्र सरकारने पीएम किसान योजनेच्या 12व्या हप्त्याची तयारी तीव्र केली आहे. दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांनी आजपर्यंत ई-केवायसी केलेले नाही, त्यांनी उद्यापर्यंत हे काम पूर्ण करावे.

जर तुम्ही देखील या योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्ही आतापर्यंत तुमचे eKYC केले नसेल, तर पुढील महिन्यात येणारा 12 वा हप्ता तुमच्या खात्यात येणार नाही. सरकारने पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य केले आहे. आणि eKYC ची अंतिम तारीख ३१ जुलै आहे. तर आज 30 जुलै आहे. त्यामुळे आता तुमच्याकडे फक्त एक दिवस उरला आहे.

सोन्या चांदीचे नवीनतम दर जाहीर! सोने 4700 आणि चांदी 22000 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या नवे दर

ई-केवायसी कसे करावे

1.ई-केवायसी (eKYC) साठी, प्रथम तुम्ही तुमच्या मोबाईल फोन ब्राउझरचे क्रोम सारखे आयकॉन उघडा.
2.येथे pmkisan.gov.in टाइप करा. आता तुम्हाला पीएम किसान पोर्टलचे मुख्यपृष्ठ दिसेल.
3.आता त्याच्या खाली जा आणि तुम्हाला e-KYC लिहिलेले दिसेल. त्यावर टॅप करा आणि तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाका आणि शोध बटणावर क्लिक करा.
4.आता त्यात आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका.
5.आता तुमच्या मोबाईल नंबरवर 4 अंकी OTP पाठवला जाईल. दिलेल्या बॉक्समध्ये टाईप करा.

6.तुम्हाला आधार प्रमाणीकरणासाठी बटण टॅप करण्यास सांगितले जाईल. त्यावर टॅप करा आणि आता तुमच्या आधार लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर आणखी 6 अंकी OTP पाठवला जाईल. ते भरल्यानंतर सबमिट वर टॅप करा.
7.जर सर्व काही ठीक झाले तर eKYC पूर्ण होईल अन्यथा तुम्हाला Invalid लिहिलेले दिसेल. असे झाल्यास तुमचा हप्ता मिळण्यास विलंब होऊ शकतो.
8.जर तुमचे eKYC आधीच पूर्ण झाले असेल तर eKYC आधीच पूर्ण झाले आहे असा संदेश दिसेल.

पेरू उत्पादक संकटाच्या छायेत! घटू शकते उत्पादन; करा हे उपाय, होईल फायदा

पीएम किसान योजना काय आहे?

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाते. हा हप्ता दर चार महिन्यांनी येतो.

म्हणजेच या योजनेअंतर्गत 2000-2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षातून तीनदा पाठवले जातात. केंद्र सरकार हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करते. आतापर्यंत प्रत्येकी 2,000 रुपयांचे 11 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत.

बाराव्या हप्त्याचे पैसे कधी येणार?

तुम्हाला सांगतो की पीएम किसान योजनेंतर्गत 1 एप्रिल ते 31 जुलै या कालावधीसाठी लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे पैसे दिले जातात. दुसऱ्या हप्त्याचे पैसे 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान हस्तांतरित केले जातात. याशिवाय तिसऱ्या हप्त्याचे पैसे १ डिसेंबर ते ३१ मार्च दरम्यान ट्रान्सफर केले जातात.

यावेळी पीएम किसान योजनेच्या 11व्या हप्त्याचे पैसे पीएम मोदींनी 31 मे 2022 रोजी शिमला येथे हस्तांतरित केले. 2022 च्या दुसऱ्या हप्त्याचे पैसे 1 सप्टेंबर 2022 रोजी शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग होणार असल्याचे समोर येत आहे.

महत्वाच्या बातम्या:
पशुपालकांनो सावधान! प्राण्यांमध्ये पसरत आहे हा रोग; अशी घ्या काळजी
भावांनो शेळीपालनात यशस्वी होयचंय ना! तर या सामान्य चुका करणे टाळा आणि व्हाल मालामाल

English Summary: PM Kisan beneficiaries beware!
Published on: 30 July 2022, 06:19 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)