PM Kisan: देशातील शेतीला (Farming) चालना मिळावी यासाठी केंद्र सरकार (Central Goverment) अनेक पावले उचल आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना (Scheme) राबवल्या आहेत. त्यातील एक महत्वाची योजना म्हणजे पंतप्रधान सन्मान निधी योजना होय. या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला ६००० रुपये २००० हजारांच्या ३ हफ्त्यांमध्ये देण्यात येतात.
शेतकऱ्यांचे (Farmers) उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने मोदी सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. बाराव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. लवकरच त्याला 12 व्या हप्त्यासाठी 2,000 रुपये मिळणार आहेत. मात्र यावेळी काही शेतकऱ्यांना दोन हजारांऐवजी चार हजार रुपये मिळू शकतात.
पीएम किसान सन्मान निधी योजना ही सरकारची अशीच एक योजना आहे. ज्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवले जातात. प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6,000 रुपये ट्रान्सफर केले जातात. सरकार हे पैसे तीन समान हप्त्यांमध्ये पाठवते. म्हणजेच केंद्र सरकार प्रत्येक हप्त्यात 2,000 हजार रुपये हस्तांतरित करते.
12वा हप्ता कधी येणार
पीएम किसान योजनेच्या पुढच्या म्हणजे 12व्या हप्त्याबद्दल बोलायचे झाले तर लवकरच करोडो शेतकर्यांना चांगली बातमी मिळणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला पैसे ट्रान्सफर केले जाऊ शकतात.
वास्तविक, शेवटचा हप्ता म्हणजेच 11वा हप्ता केंद्र सरकारने 31 मे रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला होता. त्यावेळी दहा कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यात आले होते.
नोकरी काय करताय? हा व्यवसाय करा आणि बना करोडोंचे मालक; जाणून घ्या...
या शेतकऱ्यांना चार हजार रुपये मिळणार
देशात अजूनही असे अनेक शेतकरी आहेत. ज्यांच्या खात्यात 11 व्या हप्त्याचे 2,000 रुपये आलेले नाहीत. अशा परिस्थितीत 11 व्या आणि 12 व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांना एकाच वेळी देता येतील.
म्हणजेच, दोन्ही हप्त्यांमध्ये रुपये 2000 – 2000 जोडून, 4,000 रुपये त्याच्या खात्यात जमा होऊ शकतात. मोठ्या रकमेच्या खात्यात एकत्र आल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
पशुपालकांनो सावधान! हा जीवघेणा आजार जनावरांमध्ये झपाट्याने पसरतोय, असा करा बचाव...
अवैध लाभार्थ्यांना नोटीस
अनेक दिवसांपासून पंतप्रधान किसान योजनेचा बेकायदेशीरपणे फायदा घेत असल्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. हे करणार्यांवर सरकार कडक झाले आहे.
सरकार अशा लोकांना पैसे परत करण्यासाठी नोटिसा पाठवत आहे. हे पैसे त्वरित परत करावेत, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. पैसे परत न केल्यास कठोर कारवाई होऊ शकते.
महत्वाच्या बातम्या:
केळी उत्पादकांनो सावधान! बंची टॉप विषाणूचा होतोय प्रादुर्भाव; करा हा उपाय अन्यथा होईल मोठे नुकसान
सर्वसामान्यांना मिळणार मोठा दिलासा! सणासुदीच्या काळात खाद्यतेल होणार इतक्या रुपयांनी स्वस्त
Published on: 03 August 2022, 04:24 IST